आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘दिवाळखोर’ कारभार! वाई तहसिलदार यांच्या आदेशाची होतेय दुय्यम अधिकाऱ्यांकडूनच पायमल्ली  कारण काय?

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘दिवाळखोर’ कारभार! वाई तहसिलदार यांच्या आदेशाची होतेय दुय्यम अधिकाऱ्यांकडूनच पायमल्ली  कारण काय?

सातारा वाई.प्रतिनिधी.
वाई तहसिल कार्यालयातील प्रशासकीय शिस्त आणि अधिकारी वर्ग यांचेतील समन्वय पुर्णतः कोलमडल्याचे चित्र आढळून येत आहे. जनतेच्या कामांसाठी आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा मोठा अभाव आढळून येत आहे. तहसिलदार यांच्या विषेशआदेशांना त्यांचेच कार्यालयातील दुय्यम अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली दाखवल्याचा धक्कादायक प्रकार अनेक वेळा समोर येत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात मोठे अधिकारी कोण? तहसीलदार कि त्यांचे कार्यालयातील दुय्यम अधिकारी, असा संतप्त सवाल वाई तालुक्यातील सर्व सामान्य जनतेतून विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नुसार सर्व सामान्यांचे अनेक तक्रार अर्ज तहसिलदार यांचे कडे येत असतात. काही काळानंतर यावर सुनावणी देखील होते त्यात तहसीलदार तसे लेखी आदेश देखील देतात मात्र या आदेशांची सर्रास पायमल्ली याच तहसील कार्यालयातील दुय्यम अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचे चर्चा येथे येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. तहसीलदार यांनी आदेश देवून सुद्धा महिनो महिने नागरिकांची कामे दुय्यम अधिकाऱ्यांकडून अडवून का? ठेवली जात आहेत याचे कारण काय? कामात ढिसाळ पणा ,कामे रेंगाळत ठेवणे, उडवाउडवीची उत्तरे देणे यांचे कारण काय? अर्थकारण तर नाही ना? तहसील कार्यालयातील दुय्यम अधिकारी हे प्रशासकीय शिस्त न पाळता ” हम करे हे कायदा ” असे काम करताना दिसून येत आहेत. अर्ज ,आदेश, एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यासाठी महिन्यांन पेक्षा जास्त काळ ओलांडला जात आहे या मुळे सर्व सामान्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र समोर येत आहे. स्वतःच्याच आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तहसिलदार हे काय हे कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई करणार का? असा संतप्त सवाल वाई तालुक्यातील नागरिक करत आहे.यामुळे महसूल विभागाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून वरिष्ठ पातळीवरून यात लक्ष घालणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.

2) वाई:-राष्ट्रीय कामगार भूषण 2026 सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय जाधव यांना प्रदान!

कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार सोहळा रविवारी साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज व माननीय आमदार सतेज पाटील उपस्थित होते. त्यावेळी सतेज पाटील म्हणाले, शाहू, फुले आंबेडकरांचा समतावादी विचार आणि संतांचे मानवतावादी शिकवण लाभलेला महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या मागे जाऊ नये. जात धर्म, पंथ यांच्या नावावर समाजात वाढत असलेली दरी कमी करण्यासाठी समाज शिक्षणाची व्यापक चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. पुरस्कार हा केवळ गौरव नसून समाजाप्रति अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे सांगितले. सामाजिक बांधिलकीची भावना जपत पुढील पिढीला प्रेरणादायी विचारांचा वारसा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्य ,पत्रकारिता, कला, क्रीडा, उद्योग, कृषी, सहकार योग ,,आरोग्य, अध्यात्म, कामगार आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी नि:स्वार्थ सेवाभावाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील समाजसेवक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय खंडू जाधव यांना राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार 2026 यावेळी प्रदान करण्यात आला. गेले 29 वर्षे दत्तात्रय जाधव हे गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड वाई येथे कार्यरत असून सातत्यपूर्ण कामावरील निष्ठा व प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्यांना पुरस्कार देण्यात आला. वाई गणपती घाट स्वच्छतामोहीम, पाचगणी घाटात पशु पक्षांसाठी धान्य पाण्याची व्यवस्था करणे, वृद्धाश्रमात मदत करणे, रक्तदान करणे ,वृक्षारोपण अन्नदान, करणे या व अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. शिवाय योगासनाचे प्रशिक्षण ते देत असतात सामाजिक क्षेत्रातील कार्याचा विचार पाहता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला जाधव यांचा त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे तसेच त्यांना मिळालेल्या २०२६ राष्ट्रीय कामगार भूषण पुरस्कार याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

3) वाई:-निसर्ग संवर्धनाचे पाऊल: सामाजिक कार्यकर्ते पती- पत्नी श्री.दत्तात्रय जाधव व सौ. छाया जाधव यांनी केली अनोख्या पद्धतीने वृक्ष लागवड.

पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज ओळखून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रेय जाधव व त्यांच्या पत्नी सौ छाया जाधव यांनी वृक्ष लागवडीची नवीन आणि कौतुकास्पद संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
आजच्या आधुनिक काळात प्रदूषण व वृक्षतोड ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर शासकीय स्तरावर प्रयत्न यावर न थांबता प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, हाच संदेश जाधव दांपत्याने आपल्या कार्यातून सर्वांना देण्यात आला आहे. त्यांनी आगामी काळात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षरोपण करण्याचा तसेच नुसती वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्धारच बांधला आहे. निसर्गाच्या संगोपनासाठी अनेक ठिकाणी पिंपळ, कडूलिंब,वड अशा ऑक्सिजन देणाऱ्या तसेच पर्यावरणाला पूरक असणाऱ्या वृक्षांची लागवड केली आहे.
यावेळी त्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवडीची एक नवीन संकल्पना तयार करून वाई तालुक्यातील सोमजाई नगर येथील डोंगराळ परिसरात सीड बॉल बनवून स्वीट बॉल पद्धतीने कडुलिंब चिंच या झाडांची लागवड केली तसेच आंबा, जांभूळ ,फणस, साग या भारतीय वृक्षांच्या बियांची लागवड करून सर्व निसर्ग प्रेमींना एक अनमोल संदेशच दिला आहे. प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक वर्षी किमान दोन झाडे लावून त्या झाडांचे संरक्षण व संवर्धन करावे असे आव्हान श्री दत्तात्रय जाधव व त्यांची पत्नी सौ.छाया जाधव प्रत्येकास केले आहे निसर्गाने आज पर्यंत आपल्याला बरेच काही दिले आहे आता आपणही निसर्ग जपण्यासाठी प्रत्येकाने निसर्गाचे देणे म्हणून काम करणे गरजेचे आहे असेही जाधव पती-पत्नी दापत्यांकडून सांगण्यात आले. त्यांनी केलेल्या या नवीन वृक्ष लागवड पद्धतीचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button