पुसेसावळी:- राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

पुसेसावळी:- राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
पुसेसावळी (ता. खटाव ):- शिवजयंतीच्या पावन पर्वावर राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात अनावरण करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मधुकर सावंत (भाऊ) संस्थापक अध्यक्ष, युनिटी शिक्षण संस्था हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे, पोवाडे व सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. आपल्या मनोगतात मधुकर सावंत (भाऊ) यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व आणि स्वराज्याच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
शेवटी उपस्थितांच्या साक्षीने झालेला हा ऐतिहासिक क्षण विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्ती व स्वाभिमानाची अमिट छाप उमटवून गेला. शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल भविष्य घडविण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.हणमंत ठोंबरे, सुपरवायझर सौ.कविता भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कोमल यादव व कार्यक्रमाचे आभार कु. नागेश्वरी पवार यांनी मानले. शिवजयंतीचा हा सोहळा पुसेसावळी परिसरासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला.




