भारती विद्यापीठ:-(पुणे)-कात्रजमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश; सराईत आरोपी जेरबंद, १.३० लाखांचे ४ मोबाईल जप्त!
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विद्यापीठ:-(पुणे)-कात्रजमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश; सराईत आरोपी जेरबंद, १.३० लाखांचे ४ मोबाईल जप्त!

पुणे | प्रतिनिधी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सराईत आरोपीला शिताफीने अटक केली. आरोपीकडून एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
दि. २४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसस्टॉप परिसरात फिर्यादी महानतेश दानप्पा डोमनाळ हे दुध घेण्यासाठी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान उमर शेख, साहील शेख आणि राहुल निकम यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा) याला वंडरसिटी रोड परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईलसह एकूण चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
जप्त मुद्देमाल :
सॅमसंग A33 – ₹35,000
सॅमसंग A17 – ₹40,000
विवो मोबाईल – ₹30,000
ओप्पो मोबाईल – ₹25,000
एकूण किंमत : ₹1,30,000
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




