रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR.PRALHAD CHAVAN – 8208717483

रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा संपन्न.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी च्या अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित “अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” ऑनलाईन कार्यशाळा 16 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी दिली.
या ऑनलाईन कार्यशाळेस मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहा. प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका, प्रा. डॉ.रिता मदनलाल शेटीया यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आणि फोंडाघाट महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे उपस्थित होते.
“अर्थसंकल्प 2026: अंतरंग आणि विश्लेषण” समजून सांगताना डॉ. रिता यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि अर्थसंकल्पाचे अंतरंग सांगताना तीन कर्तव्यावर आधारित अर्थसंकल्प महत्वाच्या चार आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान आणि विकासाचे चार स्तंभ शेतकरी, युवा, महिला आणि एमएसएमइ यावर चर्चा करून अर्थसंकल्पाचे परिणाम सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत माने यांनी केले. तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




