लोहगाव :-श्री क्षेत्र सरला बेट संस्थान येथे दुर्गाष्टमी उत्सव.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
श्री क्षेत्र सरलाबेट संस्थान येथे दुर्गाष्टमी उत्सव
–
लोहगाव वार्ताहर
श्रीक्षेत्र सरलाबेट येथे दुर्गाष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सरलाबेटावर होणाऱ्या होम हवण व गुरुमंत्र कार्यक्रमासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
सोमवारी दि.३ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे अमृतमय वाणीतुन सुश्राव्य प्रवचन भाविकांना श्रवण करता येईल.
योगीराज सद्गुरू श्री गंगागीरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगीरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व महंत गुरुवर्य रामगीरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून भाविकांनी या ज्ञानयज्ञ सोहळयात आनंदाचा क्षण तेवत ठेऊन लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू श्री गंगागीरीजी महाराज श्री क्षेत्र सरलाबेट संस्थान व भाविकांनी केले आहे.
होमहावण पुरणाहुतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.