आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-वाईमध्ये १ मे पासून वसंत व्याख्यानमाला; ११० वे ज्ञानसत्र रंगणार.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईमध्ये १ मे पासून वसंत व्याख्यानमाला; ११० वे ज्ञानसत्र रंगणार.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, ता. २६ : येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमालेचे ११० वे ज्ञानसत्र १ ते २१ मे दरम्यान उत्साहात पार पडणार आहे. गेली शंभर वर्षे अखंड सुरू असलेल्या या व्याख्यानमालेची परंपरा यंदाही वैचारिक मेजवानी देणार आहे.
या व्याख्यानमालेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी (१ मे) सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांच्या ‘माध्यमांतर’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. तर समारोप आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या ‘समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता’ या विषयावरील व्याख्यानाने होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर आणि कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दररोज सायंकाळी साडेसहा वाजता महागणपती घाट, वाई येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनदिनी सामूहिक महाराष्ट्र गीत गायन व शिवतांडव स्तोत्र पठण याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
वैचारिक आणि विविधांगी विषयांची मेजवानी
यंदाच्या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामध्ये—
डॉ. प्रणिता अशोक — आहार हेच औषध
डॉ. मंगेश कश्यप — शाश्वत विकास आणि आपण
अभिजित जोग — सध्याची युद्ध परिस्थिती आणि भारत
डॉ. विरेंद्र ताटके — वैयक्तिक आर्थिक नियोजन
निलेश ओक — रामायण-महाभारत वैज्ञानिक कालनिर्णय
जयराम पोतदार — संगीत नाटकांचा मागोवा
विकास खारगे — युनेस्कोचा गड सर करताना (मुलाखत)
डॉ. जगदीश हिरेमठ — पन्नाशी ओलांडल्यानंतर आरोग्य
डॉ. अभिजित तगारे — पहाडातील मंतरलेले दिवस
अश्विनी कुलकर्णी — रणरागिणी अहिल्यादेवी होळकर
विनोद बाबर — जगण्याचे तत्त्वज्ञान
आदित्य चौंडे — वाईचा ऐतिहासिक वारसा
श्रीराम जोशी — जागतिक ऊर्जा व पुढील दिशा
अजित मराठे — नाती हीच संपत्ती
स्वागत थोरात — डोळस निसर्गदृष्टी
सतीश पाकणीकर — चेहऱ्यांची भाषा
एअर मार्शल हेमंत भागवत — संरक्षण व्यवस्था आणि भारत
रंगनाथ नाईकडे — संत साहित्याची उपयुक्तता
आनंद वांजपे — व्यसनमुक्तीनंतरचे व्यसन (मुलाखत)
शतकभराची परंपरा, वैचारिक वारसा
गेल्या १०० वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही व्याख्यानमाला वाईच्या सांस्कृतिक व वैचारिक जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे. यंदाचे ११० वे वर्ष हा या परंपरेचा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
चौकट : निसर्गछायाचित्रांचे विशेष प्रदर्शन
वसंत व्याख्यानमालेनिमित्त १ ते २१ मे दरम्यान प्रसिद्ध वाइल्डलाईफ फोटोग्राफर देवेंद्र पोरे यांच्या निसर्ग, पक्षी व प्राण्यांच्या आकर्षक छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रसिकांनी या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button