ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुसुंबी गटात भाजप व सेना लढतीकडे जावळी तालुक्याचे लक्ष…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कुसुंबी गटात भाजप व सेना लढतीकडे जावळी तालुक्याचे लक्ष…

कुसुंबी दि: जागृत देवस्थान श्री काळुबाई मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या कुसुंबी गटात सध्या राजकीय वारे वाहत आहे. अनेकांच्या अंगात येत असले तरी ही एक लोकशाही मंदिरातील श्रद्धा आहे. तरीसुद्धा कुसुंबी जिल्हा परिषद गटात भाजपचे सौ. अर्चना ज्ञानेश्वर रांजणे आणि शिवसेनेचे सौ. कविता एकनाथ ओंबळे यांच्यामध्ये प्रमुख लढती होण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादी मधून सौ अनुराधा आतिश कदम या सुद्धा इच्छुकांमध्ये एक आहेत. विशेष बाब म्हणजे तिन्ही इच्छुक उमेदवारांचे पती हे तीन बड्या नेत्यांचे कट्टर समर्थक आहेत.
सातारा जिल्हा परिषद जावळी तालुक्यातील ३८० कुसुंबी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे . या गटात अंबेघर तर्फ मेढा आणि कुसुंबी पंचायत समिती गण असून ३४,१३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या गटात आंबेघर तर्फ मेढा गण आणि कुसुंबी गणांचा समावेश करण्यात आला आहे
इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या आंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गणाची मतदारसंख्या १७११८ इतकी आहे. कुसुंबी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या १७०१९ इतकी आहे. सर्वसाधारण पुरुषांसाठी हा राखीव आहे.

आंबेघर गणात इतर मागासवर्गीय पुरुष राखीव आहे. यामध्ये बोंडरवाडी, भुतेघर, वहिटे, बाहुल, दाभे तुर्क, तळोशी, वाळजवाडी, मुकवली, वाटंबे, रेंगडीवाडी, केडंबे, वरोशी, धारदेव, पुनवडी, नांदगणे, कुरलोशी, गाढवली, डांगरेघर, केळघर, अंबेघर तर्फ मेढा, असणी, ओखवडी, भोगवली तर्फ मेढा, गवडी, दिवदेव, दिवदेववाडी, सावली, मामुर्डी, चोरबे, भामघर, म्हाते बु., वागदरे, गाळदेव, म्हाते खुर्द, म्हाते मुरा. गोंदेमाळ, गावे येतात.

कुसुंबी पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण महिला)

मोहाट, करंजे, गांजे, पिंपरी तर्फ मेढा, वाकी, निपाणी, फुरुस, आपटी, मान्टी मुरा, केळघर तर्फ सोळशी, सह्याद्रीनगर, सांगवी तर्फ मेढा, तांबी तर्फ मेढा, काळोशी, करंदी तर्फ मेढा, निझरे, धनकवडी, सायळी, मालचौडी, मोळेशवक दुंद, एकीव, कुसुंबी, कोळेघर तेटली, सावरी, म्हावशी, जांभळमुरा, कास, कसबे बामणोली, मौजे शंबडी, मजरे शेंबडी, फळणी, वाघळी,मुनावळे, उंबरेवाडी, कारगांव, देऊर, सावरट, वेळे, जांबरुक, जुगंटी, पाली तर्फ तंब, टाकवसी, कुसवडे, मालदेव, मेट इंदवली, मेटशिंग, तांबी, वासोटा, खिरखिंडी, कुसापूर, माडोशी, अडोशी, रवंदी, मेटशिंदी गावे आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय रंगत वाढणार आहे. त्यामुळे कुसुंबी गटात वेट अँड वॉच पहावे लागत आहे. दोन्ही निवडणुका खर्चिक बाब असल्यामुळे अनेक जण आयत्या पिठावर रेगोटी मारण्यासाठी आपली नावे पुढे करत आहेत. परंतु, मॅच फिक्सिंग सारखी नावे फिक्स झाल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना प्रचारक म्हणूनच मैदानात उतरावे लागणार आहे. तरीसुद्धा येथील निवडणूक रंगतदार ठरेल अशी आशा आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button