आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई दि.24 एक गाव एक गणपती गणेश विसर्जन आनंदात साजरा.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि.24
1 गाव 1 गणपती गणेश विसर्जन आनंदात साजरा.

वाई तालुक्यातील ( भुईंज ) भिवडी या गावात कित्येक वर्षांपासून चालत आलेली ही गणेश आगमनापासुन ते गणेश विसर्जनापर्यंत जोरदार जल्लोषाने हा सण साजरा केला जातो.गेले पाच दिवस गावकऱ्यांनी बाप्पाची पुजा व आरती खुप चांगल्या पद्धतीने पार पाडली . दररोज गावात 8:30 ला बाप्पाची आरती घेण्यात यायची व सर्व गावकरी एकत्र यायचे आणि आरती करायचे.गावातील प्रत्येक घरातून बाप्पाला प्रसाद यायचा. कोणी मोदक कोणी मिठाई तर कोणी लाह्या आणायचे.गौरी पूजनाच्या दिवशी गावातील महिला आणि मुली सुंदर अशा पद्धतीने तयार होऊन प्रत्येक घरात हळदी-कुंकू लावण्यासाठी जातात. पुरुष देखील प्रत्येक घरी गौरी गणपती चे दर्शन घेण्यासाठी जातात .दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गावकरी लोकांनी बाप्पाचे विसर्जन खुप सुंदर पद्धतीने आनंदाने पार पाडले. कोणत्याही प्रकारचे चुकीचे व गैरवर्तन न करता बाप्पाला त्याच्या घरी पोहचवण्यात आले. याप्रसंगी कोणत्याही केमिकल्स / अल्कोहोलिक / गुलाल अशा उत्पादनांचा वापर ही कोणी केला नाही. गावातील महीला पुरुष मुली मुले फुगड्या खेळुन पारंपरिक गाणी म्हणत बाप्पाला निरोप देण्यात आला. अखेर सर्व गावातील गणपती एकत्र आणुन त्यांना द
श्री क्षेत्र खडकी कृष्णा नदी येथे विसर्जन करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button