प्राचार्य संजय पिसाळ यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न (जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव खटाव सातारा)
प्रतिनिधि:- दिलीप पुस्तके सातारा विभाग प्रमुख

प्राचार्य संजय पिसाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव जयराम स्वामी येथील प्राचार्य संजय पिसाळ हे आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांचा भव्य सत्कार संस्था प्रशाला व माजी विद्यार्थी शिक्षक यांनी सपत्नीक केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक सचिव शिक्षण विभाग राजेंद्र पवार अध्यक्ष डॉक्टर विकास घार्गे विधानसभा उमेदवार धैर्यशील कदम विठ्ठल स्वामी सुरेश पाटील विठोबा पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संस्थेचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब घाडगे यांनी संजय पिसाळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा गौरव केला आपल्या भाषणात धैर्यशील कदम यांनी सांगितले की शिक्षक हे आईसारखे प्रेम करतात इतरांच्या मुलांना घडवताना आपली मुले आपोआप घडतात खरच संजय पिसाळ हे अरिहंत शिक्षक आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगितले यावेळी सुरेश पाटील व अन्य शिक्षकांनी त्यांचा गौरव करणारी भाषणे झाली आपल्या भाषणात राजेंद्र पवार यांनी सांगितले की आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेऊ त्या क्षेत्रात नोकरी मिळालेच असे नाही आता शिक्षका शिवाय ज्ञान घेण्याची तंत्रज्ञानाची सोय झाली आहे संजय पिसाळ यांनी पस्तीस वर्षात अनेक विद्यार्थी घडवले जी आता उच्च पदावर आहेत अशी राजेंद्र पवार यांनी सांगितले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सत्काराला उत्तर देताना संजय पिसाळ अतिशय भावूक झाले होते आपले वडील संस्थेचे उपाध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी कधीही गर्व केला नाही तसेच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास करणे हाच ध्यास घेतला आज ही जमलेली गर्दी माझ्या कामाची पोचपावती आहे अनेक संस्थाशी माझा संबंध आला पण विद्यार्थ्यांची कधीही प्रतारणा केली नाही कारण विद्यार्थी आजन्म विद्यार्थी असतो आयुष्यात कुणाशीही भांडण झाले नाही म्हणून लोक मला अरिहंत असे म्हणतात असे त्यांनी सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात विकास घार्गे यांनी शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेमुळे अनेक कामे मार्गी लागली यात संजय पिसाळ यांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगितले या कार्यक्रमास विठ्ठलराव पिसाळ सुरेश पाटील सुहास पिसाळ एसके पिसाळ विठ्ठल स्वामी कोल्हेश्वर विद्यालयाचे प्रमुख अरुण माने रहिमतपूर चे नगराध्यक्ष वेदांत माने शिवाजीराव शिंदे अवधूत लोमटे काशिनाथ दुटाळ तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते डगळे सर यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंद काळे यांनी आभार मानले