वैजापूर:-जि.प.प्रा शाळा बिलोणी शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा.
पत्रकार बाबासाहेब सूर्यवंशी मराठवाडा विभाग अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वैजापूर:-जि.प.प्रा शाळा बिलोणी शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा.

जि.प.प्रा शाळा बिलोणी शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच शिक्षकसेना तालुका अध्यक्ष श्री. नितीन आसणे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
भारतात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर ज्ञान आणि शिक्षणाची साधना करणारे कलाम यांचे विचार आणि ज्ञानसाधनेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलोणी शाळेतील आदर्श शिक्षक श्री.नितीन आसने सर जे शिक्षक सेना संघटना वैजापूरचे तालुकाध्यक्ष आहेत तसेच शिवस्वराज्य शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्री सुनिलकाका कदम चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी बिलोणी,शिवसेना शाखा उपविभाग प्रमुख श्री अशोक हाडोळे, माजी चेअरमन श्री संजय जाधव,श्री विलास जाधव, श्री बाबासाहेब सूर्यवंशी, श्री वाल्मीक वाघ, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलोनी चे मुख्याध्यापक श्री सामृत सर,शिक्षक श्री देवरे सर ,श्री कवार सर ,श्री. पालवे सर,श्री सोमासे सर,श्रीमती गिते मॅडम श्रीमती काकडे मॅडम उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगर वैजापूर तालुका मौजे बिलोणी येथे जि.प.प्रा शाळा बिलोणी मानणीय मुख्य ध्यापक श्री सामृत सर शिक्षक श्री देवरे सर श्री कवार सर श्री पालवे सर श्री सोमासे सर श्रीमंती गिते मॅडम श्रीमती काकडे मॅडम यानी नितीन आसणे सर याना सर्व गावकरी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगी सोसायटी चेअरमन सुनील कारभारी कदम सोसायटी माजी चेअरमन संजय जाधव शिवसेना शाखा उपविभाग प्रमुख श्री अशोक विष्णू हाडोळे. एसीएलएस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आर.पी.एस.स्टार न्यूज चे मराठवाडा अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी व वाल्मीक भीमा वाघ मान्यवर उपस्थित होते.




