ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई -कोल्हापूर प्रवासी ट्रॅव्हल्सचा कराड गोटे हद्दीत अपघात
प्रतिनिधी :- अभिजित बल्लाळ कराड

मुंबई वरून प्रवासी भरुन कोल्हापूरला जात असताना गोटे ( कराड )गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिवायडरला धडकून गाडी पलटी झाली. पंधरा ते विस फूट अंतरावर फरपटत रस्त्यावरुन गेली. त्या मध्ये 22 पॅसेंजर होते त्यातील 8 जण किरकोळ जखमी झाले. त्यांना हायवे ॲम्ब्युलन्सने कराड येथील दवाखान्यात दाखल केले. अपघात ठिकाण गोटे तालुका कराड गावच्या हद्दीत हाॅटेल महेद्रा समोर सातारा ते कराड लेन वरती अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा महेश
होवाळ व टीम शहर पोलिस स्टेशन चे खालीक इनामदार महामार्ग पोलिस स्टेशन चे लोखंडे साहेब यांनी मदत केली अपघाताची वेळ पहाटे 5,45 am.