सातारा जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती; सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केली जाणार……..
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती; सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केली जाणार………
December 24, 2022
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सूरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार अलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या 24 तासांत देशात 201 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 3 हजार 397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आता सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने अनेकांना असा प्रश्न पडलाय की, जर मी लसीचे दोन्ही आणि पात्र असल्यास तिन्ही डोस घेतलेत, तर मी या नवीन व्हेरियंटपासून किती सुरक्षित आहे? लोकांना हा प्रश्न पडला असला तरी, तुम्ही घेतलेली लस BF.7 व्हेरिअंट ओमिक्रॉनवरही काम करेल, असंच तज्ज्ञांच सध्याच्या घडीचं मत आहे.देशात केवळ 25% लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची सध्यस्थिती….
कराड दि.23 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात मार्च 2020 च्या शेवठच्या आठवड्यात कोरोना बाधित रुग्ण सापडू लागले. मात्र तेंव्हापासुन आजपर्यंत पूर्ण कोरोना गेला नसल्याचे चित्र असतानाच जगभरातील काही देशात कोरोनाने पून्हा कहर सूरू केला आहे.तब्बल दोन वर्ष दहा महिन्यानंतर आता पून्हा कोरोना संसर्गाचा फैलाव होतो की काय? अशी चर्चा सूरू झाल्याने देशपातळीवर सतर्केतेच्या सूचना देण्यास प्रारंभ झाला आहे.महाराष्ट्रातील बहूतांशी देवस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मास्क सक्ती केली आहे.तर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण नसल्याचे सांगून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सूभाष चव्हाण यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या 33 महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात 2 लाख 80 हजार 690 बाधितांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 725 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त 60 हजार 504 बाधित सातारा तालुक्यात तर सर्वात कमी 5 हजार 403 बाधितांची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. तर सर्वात जास्त 1 हजार 605 मृत्यूंची नोंद सातारा तालुक्यात तर सर्वात कमी 91 मृत्यूंची नोंद ही महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे.
सातारा जिल्ह्यात आजपर्यंतची तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी–जावली-10 हजार 728, कराड-44 हजार 694, खंडाळा- 15 हजार 908, खटाव-28 हजार 79, कोरेगाव-23 हजार 848, माण-19 हजार 332, महाबळेश्वर-5 हजार 403, पाटण-11 हजार 325, फलटण-40 हजार 785, सातारा- 60 हजार 504, वाई-17 हजार 594, इतर-3 हजार 245 असे आजपर्यंत 2 लाख 80 हजार 690 बाधितांची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यात आजपर्यंतची तालुकानिहाय मृतांची आकडेवारी- जावली-235, कराड-1297, खंडाळा- 204, खटाव-683, कोरेगाव-540, माण-433, महाबळेश्वर-91, पाटण-392, फलटण-723, सातारा- 1605, वाई-421, इतर-101 असे आजपर्यंत 6 हजार 725 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एकूण चाचण्या-26 लाख 29 हजार 209
एकूण बाधित-2 लाख 80 हजार 690
एकूण मृत्यू-6 हजार 725
(नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी)