सातारा:-“अजिंक्य साहित्य संगम २०२६” सातवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सातारा येथे उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“अजिंक्य साहित्य संगम २०२६” सातवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सातारा येथे उत्साहात संपन्न.

पलपब प्रकाशन संस्थेचे “अजिंक्य साहित्य संगम २०२६” हे सातवे राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा दि. ०३.०५.२०२६ रविवार रोजी सातारा येथे यशस्वीपणे पार पडला. संमेलनाध्यक्ष म्हणून युटोपिया समुहाचे डायरेक्टर, साहित्यिक श्री सागर मोरे तर उद्घाटक म्हणून पलपबचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री किरण तोडकर, प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे निवृत्त अधिकारी, साहित्यिक श्री लक्ष्मण शिंदे तसेच स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री सौ संगिता साळुंखे होते. वर्षाली देशमुख यांनी गायलेल्या गणेश स्तवन ने पलपब परिवाराने आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाहुण्यांच्या आगमनानंतर कार्यक्रमात “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मां सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण केले. तसेच उद्घाटक श्री किरण तोडकर आणि इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कवी लेखक श्री प्रकाश बारी यांनी लिहिलेली पलपब साहित्यिक प्रार्थना पलपबच्या सर्वेसर्वा सौ लिना ताईंना सुपुर्द करीत “हि प्रार्थना मी पलपबची साहित्यिक प्रार्थना म्हणून स्विकार करते आणि यापुढे पलपबच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात याच प्रार्थनेने केली जाईल असे मी जाहीर करते” असे म्हणून सर्व उपस्थितांनी सदर प्रार्थनेसाठी हात जोडून उभे राहण्याची विनंती केली. त्यानुसार या कार्यक्रमाचीही सुरुवात राज्य गीतानंतर कवयित्री सुत्रसंचालक सौ. वर्षाली देशमुख यांनी सर्वांच्या उपस्थितीत हि प्रार्थना म्हणून खऱ्या अर्थाने साहित्यिक कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर सर्व प्रमुख मान्यवरांचे सौ लिना ताईंनी पुष्प देऊन स्वागत केले. कवयित्री सौ संगिता साळुंखे यांनी स्वागताध्यक्षीय भाषण केले तर सौ. लिना ताईंनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आजपर्यंत पार पडलेल्या सर्व सहा कार्यक्रमांचा आढावा घेऊन पुस्तक प्रकाशनाविषयीची सविस्तर माहिती, त्यातील समज गैरसमज याविषयी उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनासाठी खास सुट जाहीर करुन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सात कवी लेखकांची पुस्तके प्रकाशित करून प्रत्येक कवी लेखकाला त्या पुस्तकाविषयी मनोगत करण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनात बोलताना श्री लक्ष्मण शिंदे सरांनी ते वनाधिकारी म्हणून निवृत्त झाले असल्याने झाडांचे महत्त्व सांगून त्याविषयीची कृतज्ञता आणि महत्त्व शाळा आणि इतर ठिकाणी व्याख्यानातून मी नेहमीच व्यक्त करत असतो असे सांगून त्याची दखल घेत आकाशवाणी वरही व्याख्यानाची संधी मिळाली असे नमूद केले. तसेच त्यांनी झाडावर केलेली त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी आगळीवेगळी अशी स्वरचित आरती सादर करीत सर्वांना भारावून टाकले. शेवटी झाडावरील कविता म्हणून त्यांनी उपस्थितांना “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात तर श्री सागर मोरे सरांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत जनतेच्या मानसिकतेची जबाबदारी तुम्हां साहित्यिकांच्या खांद्यावर असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यासाठी प्रगल्भ अशा बोली भाषेत लिखाण होण्याची जास्त गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या तर्कशुद्ध मार्गदर्शनाने उपस्थित सारेच इतके भारावून गेले की प्रेक्षकांमधे अगदीच कमालीची शांतता पसरली होती आणि सर्व उपस्थित अगदी कान देऊन त्यांचे ते मंत्रमुग्ध करणारे भाषण ऐकण्यात दंग झाले होते. उपस्थितांमधील बऱ्याच साहित्यिकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला साजेसे असे मार्गदर्शन केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यातच त्यांनी ही मी तुमच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या अतिसुंदर अशा मार्गदर्शनानंतर प्रथम सत्र संपल्याचे जाहीर करुन सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. या प्रथम सत्राचे सुत्र संचालन पलपबचे शिलेदार पालघर येथील कवी लेखक श्री संदीप पवार तसेच लोणी पुणे येथील कवयित्री सौ वर्षाली देशमुख यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत आळीपाळीने करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुध्दा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली होती.
अल्पोपहार नंतर लगेच कवी संमेलनाला सुरुवात झाली. अजित क्षीरसागर व वंश काळे यांनी कवी संमेलनाचे सुत्रसंचालन प्रभावी पणे पार पाडले. चाळीस कवी व कवयित्रींनी वेगवेगळ्या धाटणीच्या कविता सादर केल्या. अगदी लसीकरण पाळणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कविता, निसर्ग कविता, प्रेम कविता, अशा अनेक रसातील कवितांनी मान्यवरांची वाह वाह मिळवली. या कवी संमेलनातील सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे विद्यार्थी सहभाग. अगदी इयत्ता चौथी पासून विद्यार्थ्यांनी निडरपणे कविता सादर करून व्यासपीठ दणदणवले. आवर्जून उल्लेख करण्यासारखे म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर करून आपले वेगळेपण दाखवून दिले.
विजय कदम सर यांनी कार्यक्रमाचे सांगता प्रसंगी सर्व साहित्यिकांचे, मान्यवरांचे व ज्यांच्या मुळे हे संमेलन यशस्वी पार पडले अशा सर्व सारस्वतांचे आभार मानले. शेवटी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा सर्वांनी निरोप घेतला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



