वैजापूर:-हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नारंगी-सारंगी धरण वैजापूर येथे 7 तास जलसमाधी आंदोलन.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नारंगी-सारंगी धरण वैजापूर येथे 7 तास जलसमाधी आंदोलन.
मोठा पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक यंत्रणा सज्ज आसल्याने आंदोलनाचे जिव बचावले
जलसमाधी आंदोलन
सोमवार दि.१८/१२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा.
** प्रमुख मागण्या **
१) मराठा समाजाला मराठा योध्दा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी प्रमाणे २४ डिसेंबर च्या आत आरक्षण देण्यात यावे .
२) वैजापूर तालुक्यातील मराठा बांधवांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी असणाऱ्या नोंदी प्राधान्यक्रमाने शोधून तत्काळ जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे व नांदगाव तालुक्यात पूर्वी जे वैजापूर तालुक्यातील गावे होते त्यांचे रेकॉर्ड देखील तपासण्यात यावे.
३) कांदा निर्यात चालू करावी व सरसकट पिकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
४) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी द्यावी.
५) दुधाला, कापसाला, मक्का, सोयाबीन, तूर, ऊस, व शेतमालाला उत्पन्नाच्या दीड पट हमीभाव द्यावा.
६) वैजापूर तालुका व महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करून तत्काळ दुष्काळीउपाययोजना लागू करण्यात याव्यात. ७) नारंगी-सारंगी धरणामध्ये पालखेड धरणातून प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये उल्लेखिलेल्या प्रमाणे पाणी सोडण्यात यावे.
८) मराठवाड्याला हक्काचे पाणी संबंधित धरणांतून सोडण्यात यावे.
९) मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी व स्वावलंबी शेती सिंचनासाठी नदीजोड प्रकल्प करण्याज यावा इ.
आंदोलनकर्ते
श्री. अजय पाटील साळुंके
श्री प्रा .प्रशांत पा निकम
श्री. संतोष साहेबराव गोरे
श्री. दिपक पा. सहानखोरे
श्री. सुशील पा. पटारे
श्री. गणेश कारभारी जाधव
श्री. सोमनाथ शिवाजी मोरे
श्री. सोमनाथ संजय उशीर
श्री. पंडित पुंडलिक साळुंके
श्री श्रीमंत पा. कदम
श्री. रामनाथ पा. तांबे
श्री. विजय पा. कोल्हे
श्री.संतोष पा.वडगुले
श्री श्रीराम बोरसे
आंदोलनास मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग व मराठा बांधव उपस्थित होते