मायणी:-यशोदीप सोसायटीची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-यशोदीप सोसायटीची वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
मायणी प्रतिनिधी——- मायणी येथील अल्पावधीत नाव कमावलेली यशोदीप सहकारी विकास सोसायटीची 31 वी वार्षिक साधारण सभा चेअरमन केशव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी संस्थेचे सचिव गंगाराम सुगदरे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. सन 2026 27 मध्ये उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले यावेळी सोसायटीला स्व मालकीची इमारत असावी असा सभासदांचा सुरू होता इमारत बांधकामासाठी बाहेरील कर्जे उभारण्याचा अधिकार संचालक मंडळाला देण्यात आला तसेच इतर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचे मंजूर करण्यात आले या वार्षिक साधनसभेस चेअरमन केशव शिंदे, व्हॉइस चेअरमन धनाजी देशमुख, माजी चेअरमन मोहन दगडे, माजी चेअरमन संजय गुदगे राजाराम काबुगडे, शहाजी माने, उत्तम घोलप, सुदाम काटकर, पंढरीनाथ शेवाळे, अरुण सुखदरे, तसेच परिसरातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते शेवटी राजाराम काबुगडे यांनी आभार मानले




