आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-पहिल्याच सभेत, घेतला पहिलाच विषय..दारु बंद करा, बंद करा!

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

पहिल्याच सभेत, घेतला पहिलाच विषय..दारु बंद करा, बंद करा!

सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती.

पनवेल/ प्रतिनिधी : मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात आहे, शिवाय या भागामध्ये आदिवासी समाजाची अधिक लोकवस्ती असल्याने तालुक्यात आदिवासी ग्रामपंचयात म्हणून ओळखली जातेय.
या मालडुंगे ग्रामपंचायतमध्ये कोंडीचीवाडी, टावरवाडी, सातीचीवाडी, कोंबलटेकडी, ताडपट्टी, मालडुंगे, धोदाणी, पिंपलवाडी, चिंचवाडी, वाघाचीवाडी, बापदेव, देहरंग, धामणी, हैाशाचीवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र, यातील काही गावांमध्ये दारू विक्री होतांना दिसत आहे. या दारूमुळे अनेक कुटुंबामध्ये भांडण होतात, तर काहीकांची कुटुंबच उध्वस्त होताना पाहतोय. एवढाच नाही तर दारूमुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम देखील होतात.
या गोष्टींचा विचार करून ग्रामपंचायत हद्दीतील दारू बंद करण्यासाठी नवनिर्वांचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने पहिल्याच सभेत विषय घेवून ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम चौधरी, ग्रामसेवक सुरेश मोहिते यांना सांगत पोलीस विभागाला देखील ग्रामपंचायातीने दारू बंद करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यासाठी विनंती केली आहे. व तसे लेखी पत्र देखील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये दिले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button