फलटण:-आता फलटणचा आमदार बदलायचाय : प्रदीप झणझणे, प्रजा गट प्रमुख.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
आता फलटणचा आमदार बदलायचाय : प्रदीप झणझणे, प्रजा गट प्रमुख.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी वंचित राहिलेला इतर सर्व आरक्षित समाज आपापल्या समाजासाठी उमेदवारी मागणी करत असताना व दिपक चव्हाण यांचा पंधरा वर्षे आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाला असतानाच्या पार्श्वभूमीवर जर दिपक चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी देणेबाबत अंतिम शिक्कामोर्तब होत असेल तर हा निर्णय SC प्रवर्गातील इतर समाजावर अन्यायकारक असणार आहे. इतर समाजातील उमेदवार फलटण कोरेगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित राहत आहेत. वास्तविक पाहता पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत किमान तीन वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना उमेदवारी देऊन त्या प्रत्येक समाजाचा बहुमान करता आला असता आणि खरं तर फलटण तालुक्यातील व उत्तर कोरेगाव मधील मतदार जनतेला हेच अपेक्षित होते. परंतु तसे झालेले दिसत नाही हे दुर्दैवी आहे. याप्रमाणेच विकासाचा प्रश्न देखील प्रचंड ऐरणीवर आहेच. या सर्व कारणांमुळे “आता फलटणचा आमदार बदलायचाय” ही जनतेची मागणी बाळसं धरून मजबुतीने निवडणुक लढण्यासाठी स्वतः जनता आता सज्ज झाली आहे. अफाट जनशक्तीच्या प्रचंड ताकतीने यावेळी आमदार बदलला जाणार असल्याचे फलटण तालुका प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी खात्रीपूर्वक स्पष्ट केले.
आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार जनतेमध्ये कुजबुज सुरू आहे की, आरक्षण उठल्यानंतर २०२९ साली देखील संबंधितांनी दिपक चव्हाण यांनाच उमेदवारीची संधी द्यावी. त्यांना डावलण्यात येऊ नये, त्यांच्या उमेदवारीमध्ये खंड पडू देऊ नये, त्यांच्यावर अन्याय करण्यात येऊ नये, “फलटण कोरेगाव विधानसभेच्या निवडणुका अनेक परंतु उमेदवार एकच” या परंपरेला छेद देण्यात येऊ नये अशीच संपूर्ण फलटण तालुका मतदार जनतेची अपेक्षा असणार, अशाप्रकारे फलटण तालुका प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी झणझणीत टीकास्त्र डागून इतर समाजातील सर्व मतदार नागरिकांनी येणाऱ्या फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीत योग्य ठिकाणी मतदान करणे अपेक्षित असल्याचे परखड मत व्यक्त केले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणुका आल्यानंतर प्रत्येक विद्यमान सदस्याला वाटते की मला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी. हि भावना देखील नैसर्गिक असते, त्यात काही वावगं नाही. परंतु त्यावेळी मात्र त्या प्रत्येकांना संबंधितांकडून सांगण्यात येते की, तुम्हाला मागच्या वेळी उमेदवारी दिली आहे ना, आपण पुढील वेळी इतर काही विचार करू, आता मात्र दुसऱ्याला देऊ देत. परंतु फलटण कोरेगाव विधानसभेसाठी मात्र एकाच व्यक्तीची उमेदवार म्हणून चौथ्यांदा निवड होत असल्याचे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. कार्यकर्त्यांनी देखील आता चार चार वेळा नगराध्यक्ष, चार चार वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य-सरपंच, पंचायत समिती सदस्य-सभापती व्हायला काही हरकत नसावी. यावर विचार करण्याची आता योग्य वेळ आली असल्याचे सांगून “आता फलटणचा आमदार बदलायचाय” असे प्रजा गटाचे प्रमुख प्रदीप झणझणे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले.