कराड:-दसऱ्यानिमित्त आमदार मनोजदादा घोरपडे यांचे पालीतील खंडेरायाचे दर्शन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-दसऱ्यानिमित्त आमदार मनोजदादा घोरपडे यांचे पालीतील खंडेरायाचे दर्शन.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही.
कराड :- विजयादशमीच्या निमित्ताने कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाली येथील जागृत देवस्थान श्री खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
कराड उत्तर परिसरात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आधार देणे आवश्यक असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“दुष्काळात शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असून, कोणालाही अन्न-पाणी किंवा मूलभूत सुविधांची अडचण भासू देणार नाही,” अशी ग्वाही आमदार घोरपडे यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, अजित साळुंखे, सातारा पंचायत समितीच्या उपसभापती सुभाषताई जाधव, पाली गटाचे नेते सुरेश पाटील, माजी मंडल अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, सतीशरावण शिंदे, संतोष पाटील, गणेश इंगळेकर, शिवराज पाटील, सुनीलनाना काळभोर, माजी सरपंच गणेश जाधव, संजय काळभोर, हरीश पाटील, सुनीताताई घाडगे, प्रशांत भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




