क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-तळोजा, नवी मुंबई येथे फायरींग करणारे तीन आरोपी ताब्यात. आंबेगाव पोलीस स्टेशनची धमाकेदार कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पनवेल:-तळोजा, नवी मुंबई येथे फायरींग करणारे तीन आरोपी ताब्यात. आंबेगाव पोलीस स्टेशनची धमाकेदार कामगिरी.

दि. २४/१०/२०२६ रोजी रात्रौ ०१/१७ वा चे सुमारास मारवा बिल्डींगचे खाली, शिवाजी चौकाचे बाजुला, फेज-२, तळोजा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड याठिकाणी आरोपींनी आर्थिक व्यवहारातुन फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचेवर पिस्टलने फायर करुन गंभीर जखमी केले व फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावरुन नवी मुंबई येथील तळोजा पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५३७/२०२६ भा.न्या.सं.१०९(१), ११८(२), ११८(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), आर्म अॅक्ट ३(२५), २७ (२), म.पो. अधि ३७ (१) सह १३५ अन्वये दिनांक २४/१०/२०२६ रोजी गुन्हा नोंद आहे.

वर नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी दत्तनगर परीसरात असल्याची माहीती आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांना आज रोजी मिळाल्याने मिळाल्याने आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकासह सदरठिकाणी जावुन सापळा रचुन खालीलप्रमाणे पाहीजे आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

१) रुद्र दादासाहेब बारवकर वय-१९ वर्षे रा. म्हस्के चाळ, जैन मंदिर रोड, संतोषनगर, कात्रज, पुणे.

२) अनिकेत प्रताप नरवडे वय-१९ वर्षे रा. मु. खंडाळे, रांजणगाव ता. शिरूर, पुणे.

३) सौरभ गोरख चौधरी वय-२४ वर्षे रा. संतोषनगर कात्रज पुणे

वर नमुद आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील कारवाई कामी नवी मुंबई पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, मा. श्री सागर कवडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.

(श्री. शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button