पुसेसावळी येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळी येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू.

पुसेसावळी :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मतदान केंद्रावरही मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावला जात आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी ४७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पात्र मतदार या निवडणुकीत सहभागी होत आहेत.
दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध उमेदवारांकडून विजयासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा नेमका कौल कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत सध्या निश्चितपणे सांगता येत नसल्याने कोण बाजी मारणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. मतदारांचा अंतिम कौल मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होईल.पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळासह संबंधित मतदारांचे लक्ष लागले आहे.




