कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीगोंदा/घारगाव – पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! नगर-दौंड महामार्गावर दोन तास रास्ता रोको.

पत्रकार राधाजी व्यवहारे, श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीगोंदा/घारगाव – पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! नगर-दौंड महामार्गावर दोन तास रास्ता रोको.

फळबागा वाचवा, तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांची आक्रमक मागणी.

पाणी मिळेपर्यंत लढा सुरूच; राजेंद्र म्हस्के यांचा प्रशासनाला इशारा.

घारगाव | प्रतिनिधी दि. २३ ऑक्टोबर –

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नगर-दौंड महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. फळबागा जगविण्यासाठी तातडीने पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.

गेल्या अनेक दिवसांपासून घारगाव, श्रीगोंदा परिसरातील शेतीला पाणी मिळत नसल्याने फळबागा, डाळिंब, पपई व इतर पिके सुकू लागली आहेत. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून पाणी सोडण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी ११ वाजता नगर-दौंड महामार्गावर एकत्र येत रास्ता रोको केला.

यावेळी शेतकऱ्यांनी “फळबागा वाचवा, तातडीने पाणी सोडा” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र म्हस्के यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जोपर्यंत आमच्या फळबागांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. प्रशासनाने तातडीने पाणी सोडले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

या रास्ता रोको आंदोलनात घारगाव, श्रीगोंदा परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतले….

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button