वाईत तहसिलदार मेटकरी त्यांचे पती शिंदे यांच्यासह वाई नगरपरिषद नगर सेवक यांचेवर कायदेशीर कारवाई साठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या उपोषणाचा आजच तिसरा दिवस.!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत तहसिलदार मेटकरी त्यांचे पती शिंदे यांच्यासह वाई नगरपरिषद नगर सेवक यांचेवर कायदेशीर कारवाई साठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या उपोषणाचा आजच तिसरा दिवस.!

वाई, प्रतिनिधी :
वाई शहरात शासकीय जागेवरील कथित अतिक्रमण आणि बंगल्याच्या दस्तनोंदणीवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाईच्या तहसीलदारांच्या कारभाराबाबत तसेच त्यांचे पती, वाईचे पशुधन अधिकारी, यांच्या बंगल्याच्या बांधकामासंदर्भात आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या आरोपांनुसार, संबंधित बंगल्याचे बांधकाम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या जागेची मालकी, बांधकामासाठी आवश्यक परवानग्या आणि संबंधित शासकीय विभागांची मंजुरी याबाबत सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. शासकीय जागेचा वापर खासगी बांधकामासाठी झाला असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.
या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा पैलू जोडला जात आहे. बंगल्याच्या बांधकामासंदर्भातील प्रकरण चर्चेत आल्यानंतर वाई नगरपरिषदेतील सुशील खरात यांच्या मदतीने बंगल्याचा दस्त त्यांच्या वडिलांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हा दस्त नेमका कोणत्या परिस्थितीत, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आला, याची तपासणी होणे गरजेचे आहे.
दस्तनोंदणी कायदेशीर नियमांनुसार झाली होती का, मालमत्तेच्या हक्कासंबंधीची कागदपत्रे योग्य होती का आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले का, याची संबंधित महसूल व नोंदणी विभागाने पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अजून अशी किती प्रकरणे वाई तहसीलदार कार्यालयाकडून दडपणीची कामे केली जात आहेत याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी संपूर्ण वाई तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे.




