आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांचा सातारा आकाशवाणीवर कार्यक्रम.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई: दि.२१
‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांचा सातारा आकाशवाणीवर कार्यक्रम.

२०२६ या चालू वर्षात वेणूताई चव्हाण, यांची तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची २०२७ मध्ये जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग आणि वाड्.मय मंडळाच्या वतीने ‘साताऱ्याचे भूषण स्वर्गीय वेणूताई चव्हाण आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना समजून घेताना’ या विषयावर वाड्.मय मंडळाचे समन्वयक प्रो. डॉ. संग्राम थोरात यांनी लिहिलेल्या संहितेचे वाचन वेदिका सणस या विद्यार्थिनीने सातारा आकाशवाणीवर केले. तसेच सायुरी सणस हिने तिच्या स्वरचित कविता तर संध्या मांढरे हिने मांढरदेवीच्या काळूबाईची लोकगीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन महाविद्यालयातील एम.ए.भाग एकची विद्यार्थिनी व सध्या मानसशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या वीणा जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे पाठबळ, जेष्ठ विचारवंत श्रीधर साळुंखे यांच्या शुभेच्छा, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच धनश्री भोसले, जितेंद्र चव्हाण, प्रियांका मोरे यांचेही सहकार्य लाभले.
सातारा आकाशवाणीच्या मराठी साहित्य पत्रिका या कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्या वैदेही कुलकर्णी यांची ही संकल्पना असून, सातारा जिल्ह्यातील वाईच्या किसन वीर महाविद्यालयाला असा कार्यक्रम करण्याची प्रथम संधी मिळाली आहे. कार्यक्रमाचे प्रसारण सातारा आकाशवाणीवरुन शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद वाई पंचक्रोशी आणि सातारा आकाशवाणीच्या क्षेत्रातील रसिक श्रोत्यांनी ध्यावा असे आवाहन वाड्.मय मंडळाचे समन्वयक प्रो. डॉ. संग्राम थोरात व प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button