कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेटच्या सभासदांना लाभांश वाटपास प्रारंभ.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विटा येथीलशिवप्रताप मल्टीस्टेटच्या सभासदांना लाभांश वाटपास प्रारंभ.

: सभासदांचा विश्वास, सातत्यपूर्ण व्यवसायवाढ आणि आर्थिक शिस्तीच्या बळावर प्रगतीची वाटचाल करणाऱ्या शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विटा च्या सभासदांना आर्थिक वर्ष सन २०२५-२०२६ च्या लाभांश वाटपास युवा उद्योजक तथा नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य मा. सतिश साळुंखे यांच्या शुभहस्ते उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये सभासदांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, संस्थेवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवणाऱ्या सभासदांना लाभांशाच्या माध्यमातून त्यांच्या गुंतवणुकीचा लाभ मिळत आहे. संस्थेचे संस्थापक स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांनी सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकाराच्या माध्यमातून सुरू केलेल्या कार्याचा आज मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत चेअरमन मा. शेखर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने व्यवसायवाढीबरोबरच सभासदांचे हित आणि ग्राहकसेवेला प्राधान्य दिले आहे.

यावेळी बोलताना सतिश साळुंखे यांनी सांगितले शिवप्रताप मल्टीस्टेटने अलीकडील काळात शाखाविस्तार, ग्राहक सेवा केंद्रे, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध आर्थिक सेवांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. या प्रगतीमध्ये सभासदांचे योगदान महत्त्वाचे राहिले असून, लाभांश वाटपाच्या माध्यमातून संस्थेचे सभासदांशी असलेले आर्थिक नाते अधिक दृढ होत आहे

कार्यकारी संचालक मा. विठ्ठलराव साळुंखे यांनी लाभांश वाटपाच्या प्रक्रियेबाबत व संस्था प्रतिदिवस प्रमाणे देत असलेल्या लाभांश बाबत माहिती दिली. तसेच संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत सभासदांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेची आर्थिक प्रगती होत असताना त्याचा लाभ सभासदांनाही मिळावा, ही सहकारामागील महत्त्वाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या यशामध्ये सभासदांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा असून, लाभांश वाटप हा त्या विश्वासाला दिलेला आर्थिक प्रतिसाद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सर्व संबंधित सभासदांनी आपल्या लाभांशासंदर्भातील माहिती व वाटप प्रक्रियेसाठी मोबाईल क्रमांक 9582837032 वर किंवा संस्थेच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी व्हा. चेअरमन मा.हणमंतराव सपकाळ यांच्यासह सभासद ,ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button