ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-मा परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य व नवी मुंबई रिक्षा महासंघ यांची संयुक्त बैठक मुंबई येथे संपन्न.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मा परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य व नवी मुंबई रिक्षा महासंघ यांची संयुक्त बैठक मुंबई येथे संपन्न.

दिनांक ५/१ /2023 रोजी दुपारी १२:३० वाजता परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे मा परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री विवेक भीमनवार साहेब तसेच रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य व नवी मुंबई रिक्षा महासंघ शिष्ट मंडळ यांची बैठक संपन्न झाली असता महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या खालील प्रमुख मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली सदर बैठकीमध्ये सन्माननीय परिवहन आयुक्त यांनी ओला उबेर रॅपिडो बाईक बाबत दहा अकरा तारखेस न्यायालयामध्ये शासनाच्या वतीने बाजू मांडण्यात येणार असल्याचे सांगितले सदर बैठकीमध्ये रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्री कासम भाई मुलानी यांनी बाईक टॅक्सी तसेच ओला उबेर वाहतुकीस कडाडून विरोध करून सन्माननीय आयुक्त महोदयांना बैठकीमध्येच महाराष्ट्रातील तमाम रिक्षाचालकांचा रॅपिडो बाईक तसेच ओला उबेर वाहतुकीस तीव्र विरोध असल्याचे सांगून रिक्षाचालकांच्या भावना न्यायालयापर्यंत पोहोचवण्यात येऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये रॅपिडो बाईक तसेच ओला उबेर वाहतुकीस परवानगी देऊ नये अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षाचालक मालक रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय बाबा कांबळे व सरचिटणीस कासमभाई मुलानी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालकांना जागृत करून संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षाचालक मालक आपल्या कुटुंबासह मंत्रालयावर धडक देतील अशा पद्धतीचा इशारा रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आला त्याचबरोबर बेकायदेशीर अवैध वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी नवी मुंबई आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणात जी फॉर्म च्या नावाखाली चालणारा भ्रष्टाचार त्वरित बंद करण्यात यावा याबाबत सन्माननीय आयुक्त महोदयांनी लवकरच नवी मुंबई परिवहन आरटीओ विभागास मी स्वतः गुप्त भेट देण्यात येणार आहे असे आश्वासित केले त्याचबरोबर रिक्षा परवाना मुक्त धोरण याबाबत रिक्षा परवाना बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ यांच्याकडून अहवाल मागवण्यात येऊन त्याबाबत सुद्धा लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक आरटीओ कार्यालयात बेकायदेशीरपणे अशासकीय कर्मचारी नेमून त्यांच्या हस्ते रिक्षाचालक तसेच नागरिकांच्याकडून दररोज लाखोंची वसुली होत आहे त्याबाबत सुद्धा आयुक्त महोदयांनी नाराजी व्यक्त करून कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले कल्याणकारी महामंडळाबाबत सन्माननीय आयुक्त महोदयांनी महामंडळाच्या वतीने रिक्षा चालक मालक यांना कशा पद्धतीने सहाय्य करण्यात येईल याबाबत सुद्धा स्वतःहून सकारात्मक चर्चा केली तसेच रिक्षा चालक 9 ते 10 हजार रुपयाचा इन्शुरन्स घेत असतो परंतु हजारांमधील एक सुद्धा एक्सीडेंट क्लेम करत नाहीत याबाबत केंद्र शासनास पत्र लिहून कमीत कमी इन्शुरन्स असला पाहिजे याबाबत मागणी करण्यात येईल असे सन्माननीय आयुक्त महोदयांनी स्वतःहून लक्ष घालण्याचे आश्वासन दिले सदर बैठकी मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालय आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली सदर बैठकीस सन्माननीय आयुक्त श्री विवेक भिमनवार तसेच रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री कासम भाई मुलानी, नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र तांडेल सीबीडी बेलापूर रिक्षा युनियन अध्यक्ष श्री विष्णू दिघे महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेचे संघटक श्री महेश माळी इत्यादी प्रतिनिधी सदर बैठकीस उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button