सातारा:-नागठाणे येथील अजिंक्य कला क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमानी साजरा.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
नागठाणे येथील अजिंक्य कला क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमानी साजरा.
नागठाणे येथील अजिंक्य कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ यंदा 31 वे वर्ष साजरे करीत
नागठाणे नगरी मध्ये नवनवीन संकल्पना व उपक्रम मंडळ राबवित असते
गेली 31 वर्षे मंडळ विविध सामाजिक , ऐतिहासिक , पौराणिक विषयावर जीवंत देखावे सादर करत आले आहे
यंदा देशात अमृत महोत्सव साजरा होत आहे , त्यानिमित्ताने मंडळाने यंदा चाफेकर बंधू अर्थात रँड चा वध हा जिवंत देखावा सादर केला आहे , 40 कलाकार यामध्ये सहभागी आहेत
तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये 150 रक्तदातेनी रक्तदान केले
तसेच नवीन मराठी शाळा याठिकाणी शिक्षक दिन साजरा करून वृक्षारोपण करण्यात आले
दर वर्षी प्रमाणे महाप्रसाद वाटप होणार आहे
अशी माहिती अजिंक्य कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ नागठाणे यांनी दिली यासाठी अक्षय ब्लड बँक यांनी सहकार्य केले.