कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीराजकीय

कणकवली:-विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा,अन्यथा उपोषण करण्याचा इशारा.

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा,अन्यथा उपोषण करण्याचा इशारा.

कणकवली:-कलमठ- न. सुतारवाडी येथे उभारण्यात आलेल्या अ सभामंडपाच्या छप्परावरून उच्च क्ष दाबाची विद्युत वाहिनी आहे. री विद्युत वाहिनीचा छप्पराला य स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची र शक्यता आहे. महावितरणकडे त याबाबत लक्ष वेधूनही दुर्लक्ष त केले जात आहे. महावितरणाचे त अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या ल जीविताशी खेळ करीत आहेत. २० जानेवारीपर्यंत सुरक्षिततेच्या क उपाययोजना न केल्यास २६ ना जानेवारीला सभामंडळामध्ये
ग्रामस्थ उपोषण करतील, असा
कलमठ ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांचे महावितरणला निवेदन
इशारा महावितरणला ग्रा. पं. सदस्य धीरज मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कलमठ – सुतारवाडी पिंपळपार येथील ग्रामपंचायत सभामंडपाच्या थेट छतावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्या धोकादायक स्थितीत आहे. महावितरण ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करीत आहे. संतापजनक याकडे महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मेस्त्री
| यांनी केला आहे. याठिकाणी १०० ते १५० नागरिक या सभामंडपात ये-जा करतात. सभामंडपावरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनीच लेखी पत्राद्वारे येथे जीवितहानी व वित्तहानीची दाट शक्यता असल्याचे मान्य केले असतानाही, प्रत्यक्षात केवळ प्लास्टिकचे तकलादू आवरण लावून कर्तव्यपूर्ती केल्याचा दिखावा करण्यात आला आहे. याबाबत कलमठ मी व ग्रामस्थांनी कणकवली प्रांताअधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. धोकादायक विद्युत वाहिनीच्या सुरक्षिततेसाठी २० जानेवारीपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारीला याच धोकादायक विद्युत वाहिन्यांच्या शेडखाली उपोषण केले जाईल.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button