ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा/खटाव:-Rps इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS जिल्हा आढावा बैठक संपन्न.

प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा जिल्हाध्यक्ष:9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

दिनांक-२२/०२/२०२३

खटाव:-Rps इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS STAR NEWS जिल्हा आढावा बैठक पुसेसावळी सावंत इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद देवाडीगाव यांच्या हस्ते स्वागत करण्यात तसेच मा.श्री. प्रा.पुस्तके सर, मा. श्री. कासम मुलानी साहेब, मा. श्री. शिवाजी टिके साहेब आणि इतर सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी महिला त्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा आढावा बैठकीमध्ये माननीय प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख ज्येष्ठ पत्रकार यांनी सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. यामध्ये पत्रकारितेविषयी सखोल माहिती तसेच पत्रकार म्हणजे काय पत्रकाराचे कार्य कसे असावे अशा इत्यादी विषयावरती चर्चा करण्यात आल्या. पत्रकार धाडसी, निस्वार्थी ,प्रामाणिक असायला हवा याविषयी परखड शब्दांमध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
माननीय कासम मुलाणी साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनीही आपले अनमोल अनुभव शेअर केले. प्राध्यापक पुस्तके सर ज्येष्ठ पत्रकार यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. तसेच माननीय शिवाजी टीके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले. समाजात घडत असलेल्या भ्रष्टाचाराची, अत्याचाराविषयी माहिती देऊन आपले विचार मांडले.

माननीय श्री प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्य संपादक यांनी संघटनेची मूलभूत उद्दिष्टे सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या समोर स्पष्ट केली. पत्रकारांचे कार्य कसे असावे शासकीय ,निमशासकीय ,आणि खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असताना पत्रकाराने निस्वार्थी ,निष्पक्ष आणि निर्भीड होऊन काम करावे. प्रिंट मीडिया ,डिजिटल मीडिया ,इलेक्ट्रॉनिक मीडिया इत्यादी प्रसार माध्यमांना बरोबर घेऊन पत्रकारांच्या समस्या तसेच सध्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले आणि 2005 च्या पत्रकार संरक्षण कायदा अशा वाईट कृती करणाऱ्या व्यक्तींवर शासनाने कडक कारवाई करावी, आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमातील पत्रकार बंधू-भगिनींना संरक्षण प्राप्त करून द्यावे , त्यांना न्याय मिळवून द्यावे. यासाठी आपण काम करणार आहोत अशी ग्वाही दिली. तसेच गाव ,तालुका कार्यकारणी ,जिल्हा कार्यकारणी आणि राज्य कार्यकारणी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रसार माध्यमांच्या पत्रकारांनी एकजुटीने , एक निष्ठेने एकमेकांच्या हातात हात घालून काम करायला हवे असे सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना संबोधले. सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व आरपीएस स्टार न्युजच्या पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले. प्राध्यापक दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार यांनी केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. भविष्यात नेहमी अशाच पद्धतीने आपले मार्गदर्शन पत्रकार बंधू-भगनींना लाभावे यासाठी त्यांना विनंती केली.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन खटाव तालुका अध्यक्ष माननीय श्री सौरभ चव्हाण आणि पत्रकार सहकारी आणि छान पद्धतीने केल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button