सातारा:-मुलातील मधुमेहासाठी कराडला चळवळ उभी करणार___डॉक्टर सौ गौरी ताम्हणकर.
ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मुलातील मधुमेहासाठी कराडला चळवळ उभी करणार___डॉक्टर सौ गौरी ताम्हणकर.
मायणी प्रतिनिधी_मधुमेह म्हटले की त्रास आणि पाळावी लागणारी पत्थे यांची यादीच डोळ्यासमोर येते वयाच्या 40 नंतर तसेच लहान मुलांच्या मधुमेह वाढला असून शून्य ते अठरा वयाच्या मुलांच्या मधुमेह पंधरा ते वीस टक्के वाढला आहे त्यासाठी मधुमित्र परिवाराने चळवळ उभी केली असल्याची माहिती डायबिटीस तज्ञ सौ गौरी ताम्हणकर यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली गौरी ताम्हणकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या चळवळीस हिंदुजा फाउंडेशन व ऑस्ट्रेलियाच्या लाईव्ह फॉर चिल्ड्रन चा चांगला हातभार आहे त्यामुळे या काळामधील सत्तर मुलावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत डॉक्टर् ताम्हणकर यांचे मधुमेहावर मोठे काम आहे जनजागृतीसह त्यांनी अनेक पद्धती विकसित केल्या आहेत अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या मधुमेहावर त्यांचा अभ्यास सुरू आहे मधुमेहमित्र ऍडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटिक मध्ये अभ्यास करणारी यंत्रणा उभी केली आहे दर पंधरा दिवसाला नवीन लहान मूल मधुमेह रुग्ण म्हणून येत आहे तसेच कराड पाटण सातारा खटाव पंढरपूर या भागातील मुले आणि डायबिटीस रुग्न येथे येत आहेत मधुमेहा सोबत आहार तज्ञ व फिजिओथेरपिस्ट येथे मदत करतात त्यांनी अठरा वर्षे वयातील मुले व त्यांच्या पालकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत या कार्यशाळेतील केईएम हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉक्टर चितरंजन याज्ञिक कराड येथे येऊन मुलाशी संवाद साधतात येथे आज 70 मुलावर उपचार व संशोधन सुरू आहे या लहान मुलांना महिन्याला पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो याची जबाबदारी काही संस्थांनी उचललेली आहे आज कराड मध्ये लहान मुलांसाठी मधुमेह मुक्त चळवळ उभी राहते आहे या चळवळीला सर्व समाजातून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे गौरी ताम्हणकर यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले.