आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘किसन वीर’ मधील डॉ. संग्राम थोरात यांची प्रोफेसरपदी निवड.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-‘किसन वीर’ मधील डॉ. संग्राम थोरात यांची प्रोफेसरपदी निवड.

वाई: दि. २६ सप्टेंबर २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉ. संग्राम थोरात यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या कॅस अंतर्गत प्रोफेसर या सर्वोच्च पदावरती पदोन्नती झाली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हे यश त्यांनी मिळविले आहे. या आधी ते सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत होते.
शिक्षण क्षेत्रात प्रोफेसर पद हे सर्वोच्च व प्रतिष्ठित मानले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवाल व शिफारशीवरून ही पदोन्नती दिली जाते. प्रोफेसर पदासाठी विद्यापीठाकडून विविध निकष लावले जातात. यासाठी तज्ज्ञ समितीपुढे प्राध्यापकांना विशिष्ट निकषांची पूर्तता व त्यांचे संशोधन कार्य सादर करावे लागते.
डॉ. थोरात हे वाई तालुक्यातील अमृतवाडी गावचे असून, त्यांनी या अगोदर रयत शिक्षण संस्थेच्या पुसेगाव, कोरेगाव आणि पाचवड या महाविद्यालयांत सेवा बजावली आहे. ते किसन वीर कॉलेज मध्ये गेली १८ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. वाई पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नियतकालिकांतून शोधनिबंध सादर केले आहेत व सातारा आकाशवाणीवर स्वरचित कथा सादर केल्या आहेत. ते पीएच. डी. चे मार्गदर्शकही आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ३५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. मॉरिशस, तंजावर येथे जावून त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. नोव्हेंबर २०२६ मध्ये ते श्रीलंकेतील विद्यापीठात शोधनिबंध सादर केरणार आहेत. मराठीतील शाहीर आणि शाहिरी परंपरा या संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत एका विद्यार्थ्यांने शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. संपादन केला आहे. तर सहा विद्यार्थी पीएच. डी. करीत आहेत. तसेच ते महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांचे पीएच.डी. परीक्षक म्हणून काम पाहात आहेत.
डॉ. थोरात हे नेहमीच समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्याचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
या निवडीबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, मोहनआबा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, चंद्रकांत इंगवले, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रो.डॉ. विनोद वीर, मराठी विभागप्रमुख प्रो.डॉ. चंद्रकांत कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button