शिरूर:-आदित्यशेठ धारिवाल यांचा वाढदिवस बालसंस्कार वर्गातील मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करून उत्साहात साजरा.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर:-आदित्यशेठ धारिवाल यांचा वाढदिवस बालसंस्कार वर्गातील मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करून उत्साहात साजरा.

युवा उद्योजक श्री. आदित्यशेठ प्रकाशभाऊ धारिवाल यांचा वाढदिवस सौ. स्वप्नालीताई योगेश जामदार (नगरसेविका) व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित बालसंस्कार वर्गातील मुलांसोबत सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गोष्टींच्या पुस्तकांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बालसंस्कार वर्गातील लहान मुलांनी सुंदर ‘विश्वप्रार्थना’ म्हणून आदित्यशेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केली. याप्रसंगी ‘जनविकास फाउंडेशन’च्या वतीने श्री. तुषारभाऊ वेताळ आणि श्री. भूषण कडेकर साहेब यांनी मुलांना गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप केले, तर डॉ. संतोष पोटे सर यांच्या वतीने सर्व लहानग्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेविका सौ. स्वप्नालीताई जामदार म्हणाल्या, “धारिवाल कुटुंबाचा सामाजिक व औद्योगिक वारसा सक्षमपणे सांभाळण्याचे आणि वाढवण्याचे सर्व गुण आदित्यशेठ यांच्यामध्ये आहेत. भविष्यात ते नक्कीच शहराचे नेतृत्व करतील.”
श्री. भूषण कडेकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “मुलांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर जाऊन पुस्तकांच्या जवळ जावे आणि त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आदित्यशेठ यांच्या वाढदिवसापेक्षा दुसरा मोठा मुहूर्त असूच शकत नाही.”
तसेच नगरसेविका सौ. चारुशीलाताई कोळपकर आणि श्री. तुषार वेताळ यांनीही आदित्यशेठ यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमास नगरसेविका सौ. चारुशीलाताई कोळपकर, नगरसेविका सौ. स्वप्नालीताई जामदार, सौ. डॉ. वैशालीताई साखरे, सौ. शीतलताई शर्मा, डॉ. संतोष पोटे, श्री. गणेश कोळपकर, श्री. तुषार वेताळ, श्री. भूषण कडेकर, श्री. योगेश जामदार, श्री. राजकुमार स्वामी, श्री. शहाजी पवार काका, श्री. अतुल तांबटकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. वैशाली साखरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नगरसेविका सौ. स्वप्नालीताई जामदार यांनी मानले.




