कराड:-डॉ.विश्रांती देसाई यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-डॉ.विश्रांती देसाई यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’.

कराड:-श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड यांच्या सन २०२५-२६ च्या ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ विठामाता विद्यालय, कराडच्या माजी मुख्याध्यापिका डॉ. सौ. विश्रांती राजेंद्र देसाई यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे खजिनदार मा. श्री. संजय पुरुषोत्तम बदियाणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व सचिव मा. श्री. जयंत (काका) पांडुरंग पाटील होते.
यावेळी उच्च शिक्षण मंडळाचे संचालक श्री. नंदकुमार बटाणे, संचालक अॅड. सतीश पाटील, श्री. राजेंद्र माने यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डॉ. देसाई यांचे आप्तेष्ट उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव यांनी प्रास्ताविकातून डॉ. देसाई यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. सौ. योगिता सदावरे यांनी डॉ. देसाई यांच्यासोबतच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. विश्रांती देसाई यांनी संस्थेने दाखविलेला विश्वास, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि सहकाऱ्यांनी दिलेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मिळालेला पुरस्कार हा माझ्या कार्याची पोचपावती आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे श्री. संजय बदियाणी यांनी शिक्षकांनी आदर्श शिक्षकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. अध्यक्ष जयंत (काका) पाटील यांनी डॉ. देसाई यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या कार्याचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमात श्री. ए. बी. रोडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. एस. आर. पवार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सौ. व्ही. आर. पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. ए. एस. लोंढे यांनी आभार मानले.




