श्रीरामपुर नाऊर शिवारातून गवत कापण्यासाठी गेलेल्या तीन तरुणींसह अडीच वर्षांचा चिमुकला बेपत्ता , शोधासाठी कुटुंबियांचे आवाहन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपुर नाऊर शिवारातून गवत कापण्यासाठी गेलेल्या तीन तरुणींसह अडीच वर्षांचा चिमुकला बेपत्ता , शोधासाठी कुटुंबियांचे आवाहन.

नाऊर ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर शिवारातून एक धक्कादायक आणि चित्ताजनक घटना समोर आली आहे आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जनावरांसाठी गवत कापण्याच्या उद्देशाने शेतात गेलेल्या तीन तरुणी आणि त्यांच्यासोबत असलेला अडीच ते तीन वर्षांचा एक चिमुकला अचानक बेपत्ता झाले आहेत . बराच वेळ उलटूनही हे चौधे घरी न परतल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांचा शोध सुरू आहे
बेपत्ता झालेल्यांमध्ये सोनाली विश्वनाथ आव्हाड , गौरी विश्वनाथ आव्हाड आणि पायल भागवत त्रिभूवन या तिघींना समावेश आहे यशिवाय गौरी आव्हाड यांचा अडीच ते तीन वर्षांचा मुलगा बबलू हा लहान बालकही त्यांच्या सोबत गेला होता . सायंकाळी अशिरापर्यंत चौघेही घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी शेतात आणि नाऊर परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला मात्र अद्याप त्यांचा कोणताही थांगपात्ता लागलेला नाही दरम्यान ‘ नाऊर शिवारातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या बांधावर किंवा कुंपणाच्या तारांमध्ये वीजप्रवाह सोडलेला आहे का . याचीही तातडीने तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या चौदांबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा ते कोठे निदर्शनास आल्यास कुटुंबिर्याशी खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
संपर्क क्रमांक
9975865515
9130706027




