संगमनेर:-अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध – सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

संगमनेर:-अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध – सर्वपक्षीय नेत्यांची सकारात्मक भूमिका.

संगमनेर ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची बैठक पार पडली सहकार क्षेत्रातील सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती शेतकरी व सहकारी बँकेने आजवर जपलेली सहकाराची आणि राजकारण विरहित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत अशी भूमिका बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली
आहिल्या नगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा या पुर्वीही जिल्हातील समविचारी मंडळींनी अनेकवेळा जपली आहे त्याचं परंपरेला पुढे नेत ‘ राजकीय मतभेद बाजुला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हिताच्या सर्वांनी येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा आधारस्तंभ आहे त्यामुळे निवडणूकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टिकून बँकेचे कामकाज अधिक सक्षम पारदर्शक आणि प्रगतीमुळे पुढे न्यावे तसेच बँकेची प्रगती आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले
या बैठकीस प्रमुख नेते मान्यवरांची उपस्थिती
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी मंत्री शंकरराव गडाख ‘ माजी खासदार डॉ विखे पाटील , माजी आमदार डॉ सुधीर तांबे , आमदार आशुतोष काळे , आमदार विक्रम पाचपुते , आमदार प्राजक्ता तनपुरे ‘ आमदार काशिनाथ दाते ‘ आमदार अक्षय कर्डिले ‘ श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने ‘ आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे ‘ज्येष्ठ नेते भगवानेराव पाचपुते ‘ प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते
आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमातून उपस्थिती राहून या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शविला
जी नेतेमंडळी आपल्या व्यस्त कार्यालयामुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही तसेच त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही त्या सर्वांशी समन्वय साधून त्यांना या भूमीकेसोबत येण्याचा प्रयत्न राहील
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्व समविकारी मंडळींनी एकत्र येऊन अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक आणि समंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करावे हीच बैठकीची सामूहिक भूमिका आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



