ताज्या घडामोडी
श्रीरामपूर:-हरेगाव कारखान्याचे स्क्रॅब मटेरियल काढताना अँगल पडून तरुण ठार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
हरेगाव कारखान्याचे स्क्रॅब मटेरियल काढताना अँगल पडून तरुण ठार.
श्रीरामपुर (प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील कारखान्याचे स्क्रॅब मटेरियल काढण्याचे काम सुरू असताना अंगावर टाकीचे अँगल पडून एक तरुण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे जखमीवर श्रीरामपुर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे . रुपेश वाहन कसबे ( वय 20 ) रा . अशोकनगर ( निपाणी वाडगाव ) ता श्रीरामपुर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे . हरेगाव कारखान्याचे स्कॅब मटेरिअल काढण्याचा ठेका अशोकनगर येथील भैय्या उर्फ रईस सय्यद नावाच्या ठेकेदाराने घेतला आहे . त्यामुळे हे स्क्रॅब मटेरीयल काढण्यासाठी रुपेश कसबे या तरुणासह चार जण त्याठिकाणी काम करत होते