आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-कलेढोण ते पाचवड रस्ता दुरुस्त करा – प्रवाशांची मागणी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) मायणी:-कलेढोण ते पाचवड रस्ता दुरुस्त करा – प्रवाशांची मागणी.


कलेढोण ते पाचवड हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला आहे.या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी विखुरलेली आहे. रस्त्यावर कुठेतरी डांबरी रस्ता आहे पण तोही सुस्थितीत नाही. वाहन चालकाना या रस्त्यावरून वाहन चालवने कठीण होत आहे. अगोदरच रस्ता अरुंद आहे.त्यात रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता मल्हारपेठ – पंढरपूर या हायवे ला ओलांडून जातो. परळ – खरसुंडी,ठाणे – खरसुंडी यासारख्या लांब पल्ल्याच्या बसेस ही कलेढोण मधून निघून पाचवड रस्त्याने हायवेला मिळतात. खराब रस्त्यामुळे बस या रस्त्यावरून चालवणे चालकास त्रासाचे होत असते. या मार्गावरील चारचाकी व दुचाकी वाहन चालकाना वाहने चालवणे कठीण होत आहे. या रस्त्याची झालेली दुरावस्था दूर करावी तसेच संपूर्ण कलेढोण ते पाचवड हा रस्ता चांगल्या प्रकारे डांबरी व्हावा अशी मागणी माजी प्राचार्य टी. वाय.भोसले व अनेक वाहन चालकानी केली आहे. ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी याची दखल घ्यावी अशी विनंतीही नागरिकांनी केली आहे. –

2) खटाव माण कारखान्याचे प्रति टन रु .3800 प्रमाणे ऊस बिल जमा. मायणी प्रतिनिधी–*—–
सातारा सांगली जिल्ह्यात ऊस बिल वर्ग करणे कारखान्याची आघाडी.

पडळ खटाव माण तालुका अग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड पडळ या साखर कारखान्याने २०२६-२७ च्या ऊस गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या उचलीपोटी प्रति टन 3800 रुपये दराने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आलेल्या उसाचे एकूण २४,४०,२०,५१३ रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे
सातारा सांगली जिल्ह्यात या हंगामात सर्वात अगोदर बिल जमा करून कारखान्याने आघाडी घेतली आहे या हंगामात मिळणारा साखर उतार तसेच उत्पादित साखरेस मिळणारा दर याचा समन्वय साधून पुढील हप्ता देण्याबाबत त्यावेळी निर्णय घेणेत येईल. कारखाना वेळेत ऊस बिल देण्याची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आम.श्री.प्रभाकर घार्गे व को – चेअरमन आमदार मा.श्री.मनोजदादा घोरपडे व कार्यकारी संचालक मा.श्री. संग्राम घोरपडे यांनी दिली.
कारखान्याने गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, पहिल्या उचलीपोटी प्रतिटन ३,८०० रुपये दर जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे. वेळेत ऊस बिलाची रक्कम अदा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारखान्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पुढील हंगामाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कारखाना व्यवस्थापनाने सर्व ऊस उत्पादकांचे आभार मानले आहेत.
सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला वेळेत देणे हीच कारखान्याची कार्यपद्धती राहिली आहे. याच भूमिकेतून कारखाना व्यवस्थापनाने पहिली उचल अदा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार दिला आहे.
शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ऊस बिलाची रक्कम वेळेत मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन करण्यास निश्चितच मदत होणार आहे. कारखान्याने घेतलेल्या या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.
कारखान्याचे चेअरमन मा.आम.श्री.प्रभाकर घार्गे सो , को-चेअरमन आमदार मा.श्री. मनोज घोरपडे सो. कार्यकारी संचालक मा, श्री, संग्राम घोरपडे व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शेतकरी, सभासद व कामगार यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे.शेतकऱ्यांचे हित, कारखान्याची प्रगती आणि सहकाराची समृद्धी हेच कारखान्याचे ध्येय!

3) मायणी:-अशोक गुरव कालवश.

मायणी प्रतिनिधी मायणी येथील सिद्धनाथ मारुती ट्रस्टचे विश्वस्त अशोक जगन्नाथ गुरव वय 80 यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा पत्नीसह सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्यातील गुरव समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button