वाई शहरात वाहतूक नियमांचा बोजवारा! अल्पवयीन मुला मुलींची बेधुंद रायडिंग, ट्रीपल सिट सुसाट हातात दुचाकी, नागरिकांचा जीव धोक्यात! प्रशासनाचे लक्ष जाणार कधी?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483
वाई शहरात वाहतूक नियमांचा बोजवारा! अल्पवयीन मुला मुलींची बेधुंद रायडिंग, ट्रीपल सिट सुसाट हातात दुचाकी, नागरिकांचा जीव धोक्यात! प्रशासनाचे लक्ष जाणार कधी?

वाई शहरात दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध रस्त्यांवर अल्पवयीन मुला-मुलींकडून दुचाकी सुसाट चालवली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यातच दुचाकीवर ट्रिपल सीट,चौबल सीट प्रवास करत असल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहे तसेच वाहन चालवताना कानाला मोबाईल लावून बोलणाऱ्या चालकांचे प्रकारही निदर्शनास येत आहेत.
वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असताना अशा वाहनचालकांवर प्रभावी कारवाई होत आहे का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी दिल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या तसेच रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
वाहतूक नियम हे केवळ दंड आकारण्यासाठी नसून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आहेत. मात्र नियमांकडे दुर्लक्ष होत असल्यास भविष्यात गंभीर अपघातांना निमंत्रण मिळू शकते.
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी संबंधित वाहतूक पोलीस यंत्रणेची आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त घालून, नियमभंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एकच… वाई शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस ठोस कारवाईवाईकगं कधी करणार? एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?
असा खडा सवालच वाईकर उपस्थित करत आहेत.




