सातारा:-संविधान सन्मान सभेच्या पूर्वतयारीसाठी मिलिंद भाऊ कांबळे यांचा सातारा संवाद दौरा.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-संविधान सन्मान सभेच्या पूर्वतयारीसाठी मिलिंद भाऊ कांबळे यांचा सातारा संवाद दौरा.
सातारा शहर कार्यकारणीशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीवर भर युवकांची ताकद बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्व मागे उभी करणार सातारा शहराध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे
वंचित बहुजन आघाडी सातारा शहर संघटनात्मक बांधणी ला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच आगामी संविधान सन्मान सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सातारा शहर संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे या दौऱ्याच्या माध्यमातून शहरातील विविध पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी सदस्य आणि युवकांशी संवाद साधून संघटनेची ताकद वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
भारतीय संविधानाचे मूल्य समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेचे काम करण्याची गरज असल्याचे मत सातारा शहराध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे यांनी व्यक्त केले.
सातारा शहरातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेणे कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणे नवीन कार्यकर्त्यांच्या संघटनेची जोडणे आणि संविधान सन्मान सभेच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन करणे या उद्देशाने हा संवाद दोरा सुरू करण्यात येत असल्याचे सातारा शहराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.



