वाई:-स्वर्गिय कै.प्रथमेश संतोष खैरे यांच्या स्मरणार्थ मानाचा गणपती तर्फे आजोजित मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी आशीतोष चव्हाण
स्वर्गिय कै प्रथमेश संतोष खैरे यांच्या स्मरणार्थ मानाचा गणपती तर्फे आजोजित मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.
दि.२३/०४/२०२३
मानाचा गणपती ब्राह्मणशाही वाई यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीर तसेच मोफत औषध वाटप शिबीर आज मानाचा गणपती मंदिराजवळ पार पडले.
सकाळी ९ वाजता पी आय बाळासाहेब भरणे साहेब, डॉ. सिद्धी भिलारे मॅडम, आणी डॉ. श्रेणीक सनकी यांच्या हसते फित कापून शिबिरास सुरवात झाली.
रक्तातील साखर तपासणी, रक्त दाब, जनरल चेक अप, लहान मुले आरोग्य तपासणी, जेष्ठ नागरिक तपासनी, महिला आरोग्य तपासणी अश्या विविध प्रकारच्या तपासण्या या शिबिरात झाल्या.
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबीर चालू होते नागरिकांच्या उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत होता अगदी लहान मुलांपासून जेष्ठा पर्यंत सर्वानी उपस्थिती दर्शविली.
तपासणी दरम्यान खोकला, सर्दी, ताप, ऍलर्जी, हुमिनिटी डोस, पित्ताच्या गोळ्या, सिरप आदी औषधे वाटण्यात आली.
दरम्यान हे आरोग्य शिबीर पार पडताना शंकरी कट्टा प्रतिष्ठान, संघर्ष प्रतिष्ठान, सिहंगर्जना ढोल ताशा पथक, कृष्णा नदी सेवा समिती आदी संस्थाचे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
साधारण १६२ जणांचे याठिकाणी चेक अप झाले त्यातील बऱ्याच जणांना औषध वाटप करून पुढील उपचाराचे मार्गदर्शन करण्यात आले.