मुंबई:-मातोश्रीवर शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नील गायकवाड यांची उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी दिवाळी सदिच्छा भेट!
पत्रकार महेश मोहिते

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-मातोश्रीवर शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नील गायकवाड यांची उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी दिवाळी सदिच्छा भेट!

पक्षप्रमुख उद्धवसाहेबांचे आशीर्वाद घेत दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा; ईशान्य मुंबईतील वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांशीही साधला स्नेहपूर्ण संवाद.
मुंबई, मुलुंड | प्रतिनिधी
दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुलुंड येथील शाखाप्रमुख श्री. स्वप्नील लक्ष्मण गायकवाड यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धवसाहेबांचे आशीर्वाद घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री. नितीन भोसले (ग्रा.सं.क.), शाखा क्रमांक १०३/१०४ चे उपसंघटक व शाखा क्रमांक १०३ चे कार्यालयप्रमुख, तसेच गटप्रमुख श्री. अजय जाधव आणि श्री. उमेश मोरे उपस्थित होते. यावेळी उद्धवसाहेबांना पुष्पगुच्छ व दिवाळीची भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले.
या भेटीदरम्यान उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचे मार्गदर्शन, आपुलकी आणि आशीर्वाद हे सामाजिक व जनसेवेच्या कार्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याची भावना शाखाप्रमुख स्वप्नील गायकवाड यांनी व्यक्त केली.
तसेच या दिवाळी सदिच्छा भेटीदरम्यान ईशान्य मुंबई विभागप्रमुख तथा आमदार श्री. रमेशभाई कोरगावकर, विक्रोळी विधानसभा आमदार श्री. सुनीलभाऊ राऊत, ईशान्य मुंबई विभाग महिला संघटक सौ. रश्मीताई पहुडकर, मुलुंड विधानसभा महिला संघटक सौ. नंदिनीताई सावंत, मुलुंड विधानसभा उपविभागप्रमुख (१०३/१०४) श्री. सिताराम खांडेकर, उपविभागप्रमुख (१०७/१०८) श्री. दिनेश जाधव तसेच उपविभाग महिला संघटक (१०३/१०८) सौ. हेमलताताई सुकाळे यांचीही भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या सर्व भेटींमुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली. “वरिष्ठांचे प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच सामाजिक व संघटनात्मक कार्याची खरी ऊर्जा आहे,” अशी भावना शाखाप्रमुख श्री. स्वप्नील लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली.
शेवटी त्यांनी सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची दीपावली लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



