ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुंबई:-दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मातोश्री’वर सदिच्छा भेट! उद्धव ठाकरे यांना सचिन पडवळ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मातोश्री’वर सदिच्छा भेट! उद्धव ठाकरे यांना सचिन पडवळ यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

मुंबई | प्रतिनिधी
दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व शिवसेना नगरसेवक श्री. सचिन पडवळ यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा भेटीप्रसंगी शिवसेना नेते तथा खासदार श्री. अनिल देसाई साहेब, शिवसेना सचिव श्री. सुधीर भाऊ साळवी, शिवडी विधानसभा क्षेत्रातील नगरसेवक श्री. किरण तावडे, सौ. भारतीताई पेडणेकर, युवासेनेचे मुकेश कोळी तसेच अन्य सहकारी उपस्थित होते.
दिवाळीच्या सणानिमित्त झालेल्या या सदिच्छा भेटीत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत स्नेहपूर्ण वातावरणात दिवाळीचा आनंद साजरा केला.




