नागठाणे:-दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना दिलासा! नागठाणे येथे चारा पीक बियाण्यांचे वाटप.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे:-दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना दिलासा! नागठाणे येथे चारा पीक बियाण्यांचे वाटप.

नागठाणे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग तसेच नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने सन २०२६-२७ मधील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक व बागायतदारांना चारा पीक बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असून पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला सातारा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री. संतोष साळुंखे पाटील, सातारा पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. नेवसे मॅडम, नागठाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडरे, नागठाणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सुरेश साळुंखे (मेंबर), वर्धन ॲग्रोचे संचालक श्री.अविनाश साळुंखे, नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री. गोरखनाथ यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय साळुंखे (मेंबर), श्री. चंद्रकांत महाडिक, श्री. संजय पवार, श्री. दीपक साळुंखे काका आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागठाणे, गणेशवाडी, आष्टे, सासपडे व सोनापूर या गावांतील बागायतदार व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमामुळे दुष्काळाच्या संकटात पशुपालकांना दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील पशुधन संवर्धनाला बळकटी मिळणार आहे.




