आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज:-पर्यावरण संवर्धनासाठी सातारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप व्यापाऱ्यांनी हातभार लावावा- श्रीवास्तव

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

पर्यावरण संवर्धनासाठी सातारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप व्यापाऱ्यांनी हातभार लावावा- श्रीवास्तव

भुईंज, : पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय कार्य असून मानव व पृथ्वीतलावरील जीवसृष्टीला फायदा होणार आहे. देशाची ऊर्जा वाढून शाश्वत विकास होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पेट्रोल पंप व्यापाऱ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून मोठ्या प्रमाणात परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असे आवाहन हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे वरीष्ठ विक्री अधिकारी शिखर श्रीवास्तव यांनी भुईज ता. वाई येथील पत्रकार परिषदेत केले.
भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात सोमवार दि:२४ पासून ८ मे पर्यंत ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्षम पंधरवड्याचे (संरक्षण क्षमता महोत्सव) आयोजन करण्यात आल्याने श्री . श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली.
नेट झिरो या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यहस्ते या पंधरवड्याचे उद्घघाटन होणार आहे. श्री श्रीवास्तव म्हणाले, जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय चलन खर्च कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे कार्यक्रमाचे अंतिम लक्ष आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल ऊद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबधित राज्य सरकारच्या समर्थनासह सहभागाने यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहेत. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी, इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनितीचा प्रस्ताव ठेऊन सरकारला विविध उपक्रमांच्या माध्यामातून मदत करणार असल्याचेही यावेळी श्रीवास्तव यांनी सांगितले.यावेळी पेट्रोल पंप डिलर असोसिएशनचे प्रदीप सागावकर,अंकुश शिंदे लतिफ पटेल,जयप्रकाश सावंत गुलाबराव निकम,दिलीपराब दळवी नारायण सावकार,मदन निकम आदी उपस्थित होते.
—————————————————————-

फोटो-
भुईंज- पत्रकार परिषदेत बोलताना शिखर श्रिवास्तव, समवेत अंकुश शिंदे, प्रदीप सागावकर( छाया- जयवंत पिसाळ)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button