श्रीरामपूर उत्तरेकडील ए.सी.व बी. सी नाल्याने सलग अठरा तास कोसळणाऱ्या पावसामुळे ओलांडल्या सीमा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपूर उत्तरेकडील ए.सी.व बी. सी नाल्याने सलग अठरा तास कोसळणाऱ्या पावसामुळे ओलांडल्या सीमा.

श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील उत्तरेकडील गोदावरी नदीला जोडणाऱ्या ओढ्यापौकी ए.सी व बीसी नाल्याने रौद्ररूप धारण केलेले सकाळी ग्रामस्थांना दिसले. जवळपास दोनही ओढ्यांनी एक किलोमीटरच्या आसपास मुख्य पात्राच्या आजूबाजूला पाणी पसरलेले सकाळी दहाच्या सुमारास होते. ओढ्या काठी असलेल्या वस्त्यांवरील कांदा चाळीसह तयार झालेले शेड मधील सोयाबीन मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेने सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे काल चार वाजेपासून मुसळधार पावसामुळे मोठी आर्थिक हानी शेतकऱ्यांची झाली आहे. शेतातील ऊस पिके जमिनीला झोपली असून जनावरांची चारा पिकांमध्ये घास, मका सारखी पिके वाऱ्याने खाली पडल्यामुळे सडून गेली आहेत. आज रोजी राज्यावर अतिवृष्टी सारखी मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकऱ्यांना बाजारात विक्रीसाठी काहीही नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड मोठे नुकसान झाले आहे . जनावरांना चारा काढण्यासाठी ही शेतात अतिवृष्टीमुळे चारा पिके ही सडून गेली आहेत. तरी राज्य सरकारने आता कुठलेही पंचनामे आढावा न घेता शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत करणे गरजेचे असून दीपावली पूर्वी अडचणी असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्त करण्यात यावे. याबाबत येथून पुढे आमदार खासदार मंत्री महोदयांनी कुठलेही फोटोसेशन न करता विधानसभेत सर्व सदस्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्याचा निर्णय घ्यावा. अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी माळेवाडी सरला माहांकळवाडगाव माळवाडगाव उंदीरगाव शिवारातील ओढ्याची भर पावसात पाहणी केली त्यावेळी ओढ्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झाले होते दरम्यान ग्रामस्थांनी ओढ्याकाठी असलेल्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी सुदामराव औताडे, गोरख वमने, गंगा व मनी, रवी खिलारी, सोमनाथ औताडे, ज्ञानेश्वर औताडे, विलास रसाळ, विलास गोरे, सतीश गायकवाड, योगेश जाधव, नंदकुमार जाधव, अनिल वमने, अनिल खिलारी, सुनील खिलारी, गणेश रसाळ, भाऊसाहेब वमने, प्रसाद वमने, लक्ष्मण ढोबळे, वैभव नेद्रे पत्रकार संदीप पगारे आधी नागरिक रेनकोट छत्र्या घेऊन पूर परिस्थितीचा आढावा घेवून मदतीसाठी धावली होती.




