क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाईत राजकीय भूकंप!  पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना धमकीचा आरोप! वाईच्या तहसीलदारांसह तिघांचे तात्काळ निलंबन करा! — विजयभाऊ सातपुते यांची जोरदार मागणी.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत राजकीय भूकंप!
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना धमकीचा आरोप!
वाईच्या तहसीलदारांसह तिघांचे तात्काळ निलंबन करा! — विजयभाऊ सातपुते यांची जोरदार मागणी.

पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांना मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे वाईत राजकीय भूकंप झाला आहे.या गंभीर प्रकरणामुळे पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी तसेच सर्व आंबेडकरी विचारेचे पक्ष तसेच इतर समविचारी मित्र पक्ष ही चांगलेच आक्रमक झाले असून वाईच्या तहसिलदार तसेच त्यांचे पती शिंदे तथा वाई पशुसंवर्धन अधिकारी आणि नगरसेवक सुशिल खरात यांच्या निलंबनाची मागणी पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते तसेच सर्व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासन पातळीवर केली आहे.याघटने मुळे संपूर्ण वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पिंपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा महासचिव प्रणित मोरे हे सर्व सामान्यांचे लोक हिताचे तसेच भ्रष्ट कार्यप्रणालीचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडण्याचे काम करत असतात.
ते गेली काही महिन्यांपासून वाईच्या हद्दीतील सिंचन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून करून बांधलेला बंगला हा वाईचे तहसिलदार त्यांचें पती शिंदे तथा पशुसंवर्धन अधिकारी वाई यांचा असून यांनी हा बंगला आपल्या पदाचा गैरवापर करून तसेच शासनाची दिशाभूल करून बांधलेला आहे या बंगल्याचे संपूर्ण बांधकाम वाई नगर परिषदेचे विदयामान नगर सेवक सुशिल खरात यांनीच केलेले आहे. वाईचे तहसिलदार व त्यांचे पती शिंदे तथा वाई पशुसंवर्धन अधिकारी यांच्या या भ्रष्ट कारभारा बद्दल वरिष्ठ प्रशासनाकडे वारोंवार तक्रार करून यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.


यांचाच द्वेष मनात ठेवून वाईचे तहसिलदार व त्यांचे पती शिंदे तथा वाई पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मदतीने वाई नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक सुशिल खरात हे प्रणित मोरे यांना वारोंवार फोन करून मारण्याची धमकी देत होते या संदर्भात प्रणित मोरे यांनी तशी दिनांक १०/८/२०२६ रोजी वाई पोलिस स्टेशन येथे तक्रार देखील दिली आहे. हे सर्व घडले असता वाई तहसिलदार आणि त्यांचे पती शिंदे तथा वाई पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्याच दिवशी दिनांक १०/८/२०२६ रोजी या बंगल्याचा दस्त हा वाई नगरपरिषद वाई विद्यामान नगरसेवक सुशिल खरात यांच्या वडिलांच्या नावाने करून दिल्याचे निवेदनात विजय सातपुते यांनी नमूद केले आहे तसेच त्यांनी या तिघांचेही तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे वरिष्ठ पातळीवर प्रशासनास केली आहे निवेदन देताना पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. विजय भाऊ सातपुते,वाई शहर अध्यक्ष मा. रनवीर परदेशी, जिल्हा संघटक दादा जाधव, बापू शिंदे, विजय जाधव यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button