गंगापूर:-सुलीभंजन डोंगराला आग – शेकडो सरपटणारे प्राणी व झाडांची जळुन राख.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सुलीभंजन डोंगराला आग – शेकडो सरपटणारे प्राणी व झाडांची जळुन राख.
गंगापूर प्रतिनिधी ता .२०
आज सकाळपासून पर्यटन स्थळ व प्रसिद्ध दत्त धाम सूर्यकुंड कुंड पर्यटन स्थळ असलेल्या सुलीभंजन डोंगराला खुलताबादकडुन आग लागली आज दिवसभरात तळ्याचीवाडी सयजतपुर मलकापुर कडुन जळत जळत आग रात्री उशिरापर्यंत दिवशी पाचपीरवाडी वरझडी व पुढे दौलताबाद कडे जाण्याची शक्यता यामुळे या डोंगर परिसरात असणारे जंगली प्राणी हरण.जंगली डुकर. निल गाय. व बिबट्या या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात
तसेच सरपटणारे प्राणी साप. मोर. ह्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात सुखा चारा जनावरांसाठी उपलब्ध होता परंतु आज वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशी चर्चा आता नागरिकात होत आहे.ही आग दोन ते तीन दिवस चालणार अशी शक्यता आहे . वेरूळ लेणी खुलताबाद डोंगर परिसरात आग आटोक्यात आणण्यासाठी काही ठिकाणी जालपट्टे मारलेले आहे.असेच जर या सूलीभंजन डोगर परिसरात मारले असते तरी आग आटोक्यात आली असती
एकीकडे वन विभाग व सामाजिक वनीकरण यांच्या कडुन वन महोत्सव अंतर्गत या डोंगर परिसरात हजारो झाडाची लागवड करण्यात आलेली आहे हे सर्व झाडे या आगेत जळून नष्ट होणार
खुलताबाद व वैजापूर वन विभागाची संयुक्त सीमा असल्याने याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले व भागात जाळपट्टे मारले ओढले असते तर ही आग आटोक्यात आली असती व परिसरातील जनावरांचा चारा वाचला असता .. जिल्हा प्रमुख अशोक वरकड पाटील पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत छत्रपती संभाजीनगर