आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-(चेंबूर)-आदिवासी भागासाठी झटणाऱ्या सुनिता नांगरे यांचा मुंबईत गौरव.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आदिवासी भागासाठी झटणाऱ्या सुनिता नांगरे यांचा मुंबईत गौरव.

 प्रतिनिधी सारिका गवते

तेरापंथ महिला मंडळाकडून सन्मान; सामाजिक कार्याची घेतली दखल.

मुंबई (चेंबूर) दि. १० : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चेंबूर येथे आयोजित विशेष सोहळ्यात अंधेरी (मुंबई) येथील ‘अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या’ संस्थापिका व अध्यक्षा सौ. सुनिता नांगरे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व संस्थांचा सन्मान करण्यात आला, त्यामध्ये आदिवासी भागातील कार्याबद्दल सुनिता नांगरे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
सौ. सुनिता नांगरे गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागांत शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे ४,५०० हून अधिक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले आहे. तसेच आदिवासी पाड्यांवर नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य जनजागृती केली आहे.
याशिवाय सुमारे २,००० महिलांसाठी मासिक पाळीविषयी जनजागृती कार्यशाळा घेऊन आरोग्याबाबतची जागरूकता वाढविण्याचे काम त्यांनी केले. आदिवासी महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वपूर्ण अंग ठरले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन तेरापंथ महिला मंडळाच्या अध्यक्षा ममताजी कचरा, बेला डांगी व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले होते. सन्मान स्वीकारताना सुनिता नांगरे म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नसून माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा आणि संघर्षशील आदिवासी भगिनींचा आहे. या गौरवामुळे समाजासाठी काम करण्याची जिद्द अधिक वाढली आहे.”
दरम्यान, या सन्मानाबद्दल अभिषेक सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी सुनिता नांगरे यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button