मायणी:-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उत्स्फूर्त वाव; पालक-शिक्षकांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळावा उत्साहात – विखळे येथे बाल आनंद मेळावा संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उत्स्फूर्त वाव; पालक-शिक्षकांच्या उपस्थितीत बाल आनंद मेळावा उत्साहात – विखळे येथे बाल आनंद मेळावा संपन्न.

सातारा प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके
मायणी प्रतिनिधी — सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती खटाव अंतर्गत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा विखळे येथील ताई कनेक्शन हॉलमध्ये नुकताच उत्साहात पार पडला. केंद्रप्रमुख पाचवड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुरज दादा पाटील, पंचायत समिती सदस्य राजुशेठ जुगदर, केंद्रप्रमुख रमेश सूर्यवंशी, कमळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पिसाळ सर, तसेच सर्व वर्गशिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम, कला-कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली तसेच पालक-शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.




