सिल्लोड:-शिवना येथील शिवना- आमसरी रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर काळ्या मातीचा भराव टाकून केलेली दबाई.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:- 9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
शिवना (ता. सिल्लोड): येथील शिवना- आमसरी रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर काळ्या मातीचा भराव टाकून केलेली दबाई.
सिल्लोड तालुक्यातील शिवना ते आमसरी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामानंतर साईड पंखे भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने मुरुमा ऐवजी जेसीबी यंत्राने रस्त्याकाठीच लांबच लांब चारी खोदून तीच काळी माती साईड पंख्यानवर टाकून दबाई केली आहे. वास्तविक पाहता हे साईड पट्टे मुरूमाचा भराव टाकून दाबणे आवश्यक होते. मात्र रस्त्याच्या काठाने शेतांच्या बांधालगतच्या ब्रास मध्ये जेसीबी यंत्राने चारी खोदून त्यात निघालेली काळी माती टाकत पुढे चाललेल्या जेसीबी यंत्रामागे दबाई यंत्र फिरविन्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याच्या दुतर्फा चिखलच चिखल होणार असून, हा चिखल डांबरी रस्त्यावर आल्याने अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. शिवाय जोरदार पावसात हा काळ्या मातीचा भराव पुर्णपने वाहून जाणार आहे. या कामात अजूनही बऱ्याच ठिकाणी भराव टाकण्याचे काम बाकी आहे. जळकीफाटा ते खुपटा या रस्त्याचीही अशीच अवस्था असून संबंधित कंत्राटदार काम पूर्ण होण्याआधिच बिले लाटण्याच्या तयारीत आहे. झालेल्या कामांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित विभागाने या रस्ता कामाची पाहणी करावी अशी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी आहे.