छ.संभाजीनगर:-मुकुंदवाडी भागात 28 वर्षे विवाहितेची आत्महत्या
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छ.संभाजीनगर:-मुकुंदवाडी भागात एका 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 2 मार्च रोजी घडली. या संदर्भात मुकुंदवाडी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद ही करण्यात आली होती. मात्र आता मृतविवाहतेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरोधात विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिनांक 3 मार्च रोजी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सोपानराव शंखपाळ प्रल्हाद शंखपाळ योगेश शंखपाळ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत तर मीना सोपानराव शंखपाळ राहणार लायन्स क्लब कॉलनी मुकुतवाडी असे मृत विवाहितेचे नाव आहे मीना शीला नोव्हेंबर 2021 पासून छळ होत असल्याचे भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे करत आहेत.